Join WhatsApp group

Ads

महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश? ‘त्या’ कोहिनूर हिऱ्याच्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने बदलणार शहराचे राजकीय समीकरण!

By Sarkar Maza

August 9, 2026 9:14 am

Ads

मूर्तिजापूर शहर :

मूर्तिजापूर शहराच्या राजकारणात सध्या वरकरणी शांतता दिसत असली, तरी ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. येत्या काही दिवसांत शहराच्या राजकारणात एका महत्त्वपूर्ण पक्षप्रवेशाची शक्यता असून, हा प्रवेश महाराष्ट्रातील एका बड्या नेत्यांच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा आहे.

‘तो’ चेहरा कोण?

जनमानसात पकड, तळागाळातील नागरिकांशी थेट संपर्क आणि सामाजिक कार्यातून निर्माण झालेली विश्वासार्हता असलेल्या एका प्रभावी चेहऱ्याच्या राजकीय प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, हा प्रवेश स्थानिक पातळीवर न होता महाराष्ट्रातील वरिष्ठ आणि वजनदार नेत्यांच्या हस्ते मोठ्या स्वरूपात करण्याची तयारी असल्याचे बोलले जात आहे.

युवा नेतृत्वासोबत अनुभवी चेहऱ्यांची एन्ट्री

मूर्तिजापूरच्या राजकारणात सध्या नव्या युवा नेतृत्वाची चर्चा असतानाच अनुभवी आणि जनमानसात स्थान असलेल्या चेहऱ्यांचीही राजकीय मैदानात पुन्हा एन्ट्री होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी काळात शहराच्या राजकीय समीकरणांना नवे वळण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोणाचे गणित बिघडणार?

‘त्या’ संभाव्य पक्षप्रवेशानंतर कोणाचा राजकीय प्रभाव वाढणार, कोणाचे गणित बिघडणार आणि कोणाला याचा थेट फायदा होणार, याची उत्सुकता आता वाढली आहे.

सध्या नाव आणि पक्षाबाबत अधिकृत घोषणा झालेली नसली, तरी महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या हस्ते होणाऱ्या या संभाव्य प्रवेशाने मूर्तिजापूरच्या राजकारणात नवा अध्याय सुरू होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शांतता कायम आहे… पण पडद्यामागे हालचाली वेगाने सुरू असल्याची चर्चा आहे!

Related Article

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मूर्तिजापुरात ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’आरोग्यदायी जीवनशैली आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी युवकांचा सहभाग

अण्णाभाऊ साठे चौकाचा फलक सुरक्षित राहावा; अकोला जिल्हा मातंग समाजातर्फे प्रशासनाला शांततापूर्ण मार्गाने निवेदन*

रात्री-दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या! मूर्तिजापुरात तब्बल ७ घरफोड्या उघड.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!