Join WhatsApp group

Ads

अण्णाभाऊ साठे चौकाचा फलक सुरक्षित राहावा; अकोला जिल्हा मातंग समाजातर्फे प्रशासनाला शांततापूर्ण मार्गाने निवेदन*

By Sarkar Maza

August 8, 2026 10:10 am

Ads

मुर्तीजापूर : नगर परिषदेच्या अधिकृत मंजुरीने स्थापन करण्यात आलेल्या ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक’ येथील फलकाबाबत शहरात सुरू असलेल्या उलट-सुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्हा मातंग समाजाच्या वतीने प्रशासनाशी अत्यंत शांततेच्या मार्गाने व सनदशीर मार्गाने संवाद साधत निवेदन देण्यात आले.

अकोला जिल्ह्यातील मातंग समाजातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने तहसीलदार कार्यालय, शहर पोलीस स्टेशन आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय (SDO) मुर्तीजापूर येथे भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा केली.

अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चाशिष्टमंडळाने अधिकाऱ्यांशी चर्चा करताना स्पष्ट केले की, अण्णाभाऊ साठे हे सर्वसमावेशक महापुरुष असून त्यांचा फलक नगर परिषदेच्या रीतसर मंजुरीनेच लावण्यात आला आहे.

त्यामुळे कुठल्याही राजकीय वादातून किंवा वैयक्तिक आकसामुळे हा फलक हटवला जाऊ नये आणि बहुजन-वंचित घटकांच्या भावना दुखावल्या जाणार नाहीत, याची काळजी प्रशासनाने घ्यावी.

यावर अधिकाऱ्यांनीही विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन योग्य ती कायदेशीर दखल घेण्याचे आश्वासन दिले.प्रमुख नेत्यांची उपस्थितीप्रशासनाशी शांततापूर्ण मार्गाने चर्चा करून निवेदन देताना जिल्ह्यातील विविध संघटनांचे प्रमुख नेतृत्व उपस्थित होते.

यामध्ये प्रामुख्याने: * गजाननभाऊ तायडे * योगेश सोनवणे * चंद्रकांत बोडोळे * मनीषा तायडे * सुनील खंडारे * माधवराव शिरसागर विलास सावळे यांच्यासह अकोला जिल्ह्यातील मातंग समाजातील विविध संघटनांचे कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही प्रकारचा गोंधळ न करता अत्यंत शांततेत आणि सौहार्दाच्या वातावरणात हे निवेदन सादर करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!