Join WhatsApp group

Ads

रात्री-दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या! मूर्तिजापुरात तब्बल ७ घरफोड्या उघड.

By Sarkar Maza

August 7, 2026 7:07 pm

Ads

मूर्तिजापूर शहरात रात्री तसेच दिवसाच्या वेळेत घरफोडी करून चोरी करणाऱ्या दोन सराईत आरोपींना मूर्तिजापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी केलेल्या तपासातून शहरातील तब्बल ७ घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

या कारवाईत आरोपींकडून एकूण ९३.६०० ग्रॅम सोन्याचे दागिने, ४ लाख १४ हजार ७५० रुपयांची रोकड आणि दोन मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.कारंजा आणि पालघर येथून आरोपींना अटकपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरविण्यात आली.

त्यानंतर एका आरोपीला कारंजा येथून, तर दुसऱ्या आरोपीला पालघर, मुंबई परिसरातून अटक करण्यात आली.

अटक आरोपींची नावे—१) पंकज राजू गोंडाणे (वय २९), रा. चौरे नगर, सुदगिरणी रोड, अमरावती; ह.मु. पुडुस, ता. वाडा, जि. पालघर.२) सागर जनार्धन गोगटे (वय ३७), रा. गांधी चौक, तुळजागीरवाला, अमरावती; ह.मु. मोठा मारोती, कारंजा, जि. वाशिम.पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपींच्या पोलीस कोठडीतील तपासादरम्यान मूर्तिजापूर शहरातील सात घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले.

सात गुन्ह्यांचा तपासया प्रकरणात मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात भा.न्या.सं.च्या विविध कलमांनुसार एकूण सात गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये आदर्श कॉलनी, डागाले लेआउट, तिडके नगर, वडरपुरा, गोयंका नगर, समता नगर आणि सारडा लेआउट परिसरातील घरफोडीच्या घटनांचा समावेश असल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

पोलिसांच्या तपासात संबंधित फिर्यादींकडील चोरीच्या मुद्देमालापैकी सोन्याचे दागिने आणि रोकड हस्तगत करण्यात आली आहे.९३.६०० ग्रॅम सोने अन् लाखोंची रोकड जप्त पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विविध गुन्ह्यांमध्ये मिळून ९३.६०० ग्रॅम सोने आणि ४,१४,७५० रुपये रोकड जप्त करण्यात आली आहे. याशिवाय दोन मोबाईल फोनही पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.

या कारवाईमुळे मूर्तिजापूर शहरातील घरफोडीच्या प्रकरणांच्या तपासाला महत्त्वाची दिशा मिळाली असून, आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का, याकडे लक्ष लागले आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई ही कारवाई

पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धर्मेंद्र त्र्यंबकराव जोशी यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी आणि त्यांच्या पथकाने तपास केला. तांत्रिक तपासासाठी सायबर पोलीस अकोला येथील पथकाचीही मदत घेण्यात आली.

या तपासात पोलीस अंमलदार सुरेश पांडे, नंदकिशोर, सचिन दांदळे, जीवन अंभोरे, सचिन दुबे, रोशन लकडे, गजानन खेडकर, नामदेव आडे आणि पवन इंगोले यांनी सहभाग घेतला.

सायबर तपासासाठी गोपाल ठोंबरे आणि राहुल सानप यांनी तांत्रिक मदत केली.आरोपी सध्या अटकेत असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कैलास चौधरी करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या उल्लेखनीय कारवाईबद्दल पोलीस अधीक्षकांकडून २५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!