Join WhatsApp group

Ads

स्टारमेकर अँपवरील ओळखीचा गैरफायदा; शारीरिक सुखाची मागणी केल्याप्रकरणी गुन्हा

By Sarkar Maza

August 4, 2026 4:40 pm

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी

स्टारमेकर या सोशल मीडिया अॅपवर झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत एका महिलेकडे शारीरिक संबंधांची मागणी करून, नकार दिल्यानंतर तिची बदनामी करण्याची धमकी दिल्याप्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका महिलेच्या फिर्यादीवरून भास्करनंद जोशी (वय ६२, वार्डबॉय, ठाणे) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम 75, 78, 351(2) आणि 352 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादीनुसार, फिर्यादी आणि आरोपी यांची स्टारमेकर अॅपवर ओळख झाली होती. दोघेही गायन करत असल्याने त्यांच्यात संपर्क वाढला. त्यानंतर आरोपीने फिर्यादीला वारंवार फोन करून तिची इच्छा नसताना शारीरिक सुखाची मागणी केली. फिर्यादीने नकार दिल्यानंतर आरोपीने तिच्या नातेवाईकांमध्ये प्रेमसंबंध असल्याची अफवा पसरविण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे.त्यानंतर संबंधित महिलेने आरोपीचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. मात्र आरोपीने तिच्या पतीच्या मोबाईलवर फोन व संदेश करून शिवीगाळ करत त्रास दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात अप. क्र. 618/2026 नोंदविण्यात आला असून पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जीवन अंभोरे करीत आहेत. गुन्ह्याची नोंद पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रविण खंडारे यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!