Join WhatsApp group

Ads

भगतसिंग चौकात किरकोळ वादातून काचेच्या बाटलीने हल्ला; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkar Maza

August 4, 2026 4:20 pm

Ads

मुर्तिजापूर (प्रतिनिधी): शहरातील भगतसिंग चौक परिसरातील देवा कोल्ड्रिंक्स व पान सेंटर येथे किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. या प्रकरणी मुर्तिजापूर शहर पोलिसांनी तीन अज्ञात आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हर्षद प्रकाश लोहकपुरे (वय 40), रा. भवानीनगर, मुर्तिजापूर हे 31 जुलै रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मित्रासोबत देवा कोल्ड्रिंक्स व पान सेंटर येथे बसले होते. त्यावेळी त्यांच्या पत्नीचा फोन आल्याने ते बोलत असताना शेजारील दोन युवक मोठ्या आवाजात बोलत होते. त्यांना शांतपणे बोलण्याची विनंती केल्याचा राग आल्याने आरोपींनी शिवीगाळ करत धक्काबुक्की केली आणि तेथून निघून गेले.काही वेळाने ते दोघे आणखी एका अंदाजे 40 वर्षीय व्यक्तीसह परत आले.

यावेळी त्या व्यक्तीने फिर्यादीच्या डोक्यावर काचेची बाटली फोडून गंभीर दुखापत केली. तसेच इतर दोघांनीही थपडा-बुक्क्यांनी मारहाण केली. जखमी अवस्थेतही फिर्यादीने आरोपींचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र तिघेही घटनास्थळावरून पसार झाले.

जखमी फिर्यादीवर उपचार सुरू असल्यामुळे त्यांना तत्काळ पोलीस ठाण्यात तक्रार देता आली नाही. उपचारानंतर दिलेल्या जबाब व वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 619/2026 अंतर्गत कलम 118(1), 115(2), 352 व 3(5) भारतीय न्याय संहिता अन्वये तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार योगेश लोणकर करीत असून, गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही पोलीस हवालदार विनोद कुंभरे यांनी केली. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!