Join WhatsApp group

Ads

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मूर्तिजापुरात ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’आरोग्यदायी जीवनशैली आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी युवकांचा सहभाग

By Sarkar Maza

August 8, 2026 11:02 am

Ads

मूर्तिजापूर : आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त युवा शक्तीला सकारात्मक दिशा देण्यासोबतच आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी मूर्तिजापुरात ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’चे आयोजन करण्यात आले आहे.

‘आरोग्यासाठी धावा, जनजागृतीसाठी धावा, उज्ज्वल भविष्यासाठी धावा’ या संदेशासह ही मॅरेथॉन आयोजित करण्यात आली आहे.राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, अकोला आणि तालुका क्रीडा अधिकारी, मूर्तिजापूर यांच्या संयुक्त विद्यमाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

युवकांमध्ये आरोग्य, व्यायाम आणि सामाजिक जनजागृतीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.मॅरेथॉनची सुरुवात श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक, मूर्तिजापूर येथून होणार असून बुधवारी सकाळी ६.३० वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या उपक्रमात युवकांसह नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आंतरराष्ट्रीय युवा दिन उत्साहात साजरा करावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत व्यायाम आणि आरोग्याकडे दुर्लक्ष होत असताना, अशा उपक्रमातून ‘फिट युवा, सशक्त समाज आणि उज्ज्वल भविष्य’ हा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे.

नागरिकांची उपस्थिती आणि सहभाग हीच या उपक्रमासाठी प्रेरणा ठरणार असल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

Related Article

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मूर्तिजापुरात ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’आरोग्यदायी जीवनशैली आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी युवकांचा सहभाग

अण्णाभाऊ साठे चौकाचा फलक सुरक्षित राहावा; अकोला जिल्हा मातंग समाजातर्फे प्रशासनाला शांततापूर्ण मार्गाने निवेदन*

रात्री-दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या! मूर्तिजापुरात तब्बल ७ घरफोड्या उघड.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!