Join WhatsApp group

Ads

--

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

By Sarkar Maza

August 8, 2026 3:42 pm

Ads

मूर्तिजापूर : रोहणा बॅरेज प्रकल्पातील सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांना विशेष सानुग्रह अनुदानाचा लाभ मिळावा, यासाठी बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागणीला यश आले आहे. महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागांतर्गत विदर्भातील सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेल्या ८३१ कोटी रुपयांच्या विशेष सानुग्रह अनुदान निधीतून रोहणा बॅरेज प्रकल्पातील शेतकऱ्यांसाठी ५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले.

“स्वर्गीय आमदार बी.टी. देशमुख आणि आमदार तुकारामजी बिडकरांनी विदर्भ विकासाचा वटवृक्ष लावला; त्या वारशाला जपत आमदार हरीश पिंपळे विकासाची नवी पाने फुलवत आहेत.”

या अनुदानाच्या धनादेश वितरण सोहळ्याचे आयोजन शनिवारी (८ ऑगस्ट) दुर्गामाता मंदिर, लक्कडगंज, मूर्तिजापूर येथे करण्यात आले. आमदार हरिषभाऊ पिंपळे यांच्या हस्ते लाभार्थी शेतकऱ्यांना धनादेशांचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाला बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मनोजभाऊ चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी नगराध्यक्ष हर्षलभाऊ साबळे, भाजपा मूर्तिजापूर ग्रामीण मंडळ अध्यक्ष नंदकिशोर राऊत, भाजपा कुरणखेड मंडळ अध्यक्ष प्रशांत ठाकरे, नगरसेवक भरतभाऊ जेठवानी, राम जोशी, गजाननभाऊ नाकट, यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी, संघटनेचे व पक्षाचे पदाधिकारी, प्रकल्पग्रस्त शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी संघटनेचा संघर्ष सुरूच राहणार असून, शासनाकडून मिळालेला हा निधी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा दिलासा असल्याचे मनोजभाऊ चव्हाण यांनी सांगितले. शासनाच्या निर्णयामुळे रोहणा बॅरेज प्रकल्पातील सरळ खरेदीधारक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थित मान्यवरांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर पुढील काळातही सकारात्मक पाठपुरावा करण्याची ग्वाही दिली.

आमदार हरिष पिंपळे यांच्या हस्ते धनादेश वितरण; बळीराजा प्रकल्पग्रस्त संघर्ष संघटनेच्या पाठपुराव्याला यश

Related Article

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मूर्तिजापुरात ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’आरोग्यदायी जीवनशैली आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी युवकांचा सहभाग

अण्णाभाऊ साठे चौकाचा फलक सुरक्षित राहावा; अकोला जिल्हा मातंग समाजातर्फे प्रशासनाला शांततापूर्ण मार्गाने निवेदन*

रात्री-दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या! मूर्तिजापुरात तब्बल ७ घरफोड्या उघड.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!