Join WhatsApp group

Ads

-

गुरुपौर्णिमा आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर तालुक्यात पुन्हा ‘दरबारां’ची गर्दी; श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन?रेपारखेळ परिसरातील काही दरबारांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

By Sarkarmzanews

July 27, 2026 11:34 am

Ads

सरकार माझा न्यूज

गुरुपौर्णिमा आणि नागपंचमी या श्रद्धेच्या सणांच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर तालुक्यातील काही भागांमध्ये विविध ‘दरबारां’मध्ये भाविकांची गर्दी वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. श्रद्धा ही वैयक्तिक बाब असली, तरी श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन, चमत्कारांचे दावे किंवा नागरिकांची दिशाभूल होत असल्यास त्याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याची भावना समाजातील अनेक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

यापूर्वी सरकार माझा न्यूजने अशा प्रकारच्या प्रकरणांवर वृत्तांकन करून काही व्यक्ती श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या सीमारेषेचा गैरफायदा घेत आर्थिक, सामाजिक किंवा मानसिक प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्न कसा करतात, याबाबत जनजागृती केली होती. त्यानंतर काही काळ अशा प्रकारच्या हालचाली कमी झाल्याचे दिसून आले होते.

मात्र, सणांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा काही ठिकाणी गर्दी वाढत असल्याची चर्चा स्थानिक पातळीवर सुरू आहे.

स्थानिक नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुर्तिजापूर तालुक्यातील रेपारखेळ गावाचा परिसरात सोमवारी काही दरबार भरत असून तेथे मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहत असल्याचे सांगितले जाते. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, गवई यांच्या शेतात हे दरबार भरतात. या ठिकाणी मिलिंद, आणि वानखडे तसेच भूषण , आणि आकाश व प्रकाश यांना सवारी येत असल्याचे सांगितले जाते.

याशिवाय ‘नागाची सवारी’ येत असल्याचाही दावा केला जातो. तसेच स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश आणि प्रकाश हे या दरबाराच्या आयोजन व व्यवस्थापनाशी संबंधित असल्याची चर्चा परिसरात आहे. सोमवारी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असल्याचेही स्थानिक सांगतात.वरील सर्व बाबींची स्वतंत्र अधिकृत पुष्टी झालेली नाही.

त्यामुळे या वृत्तात कोणत्याही व्यक्तीविरुद्ध निष्कर्ष काढलेला नसून, स्थानिकांकडून समोर आलेल्या माहितीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.श्रद्धेच्या नावाखाली जर कोणाकडून चमत्कार, रोगमुक्ती, संकट निवारण, भविष्यवाणी किंवा इतर अलौकिक शक्तींचे दावे करून नागरिकांची फसवणूक होत असेल, तर अशा प्रकारांची महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध व निर्मूलन अधिनियम, २०१३ तसेच इतर लागू कायद्यांच्या अनुषंगाने चौकशी होऊ शकते.

सामाजिक कार्यकर्त्यांचे मत आहे की श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील फरक प्रत्येक नागरिकाने समजून घेणे आवश्यक आहे. कोणत्याही दाव्यावर आंधळा विश्वास ठेवण्याऐवजी प्रश्न विचारणे, पुरावे मागणे आणि विवेकाने निर्णय घेणे हीच खरी सामाजिक जागरूकता असल्याचे ते नमूद करतात.

सरकार माझा न्यूजचे आवाहन :

कोणत्याही व्यक्तीविरुद्ध अफवा पसरवू नका आणि कोणत्याही दाव्यावर पुराव्याशिवाय विश्वास ठेवू नका. जर कुठे कायद्याचे उल्लंघन, फसवणूक किंवा अंधश्रद्धेला प्रोत्साहन दिले जात असल्याचा संशय असेल, तर त्याची माहिती संबंधित पोलीस, महसूल प्रशासन किंवा सक्षम शासकीय यंत्रणेला द्यावी. वस्तुनिष्ठ चौकशी होणे आणि सत्य समोर येणे हेच समाजहिताचे आहे.

Related Article

गुरुपौर्णिमा आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर तालुक्यात पुन्हा ‘दरबारां’ची गर्दी; श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन?रेपारखेळ परिसरातील काही दरबारांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

जोशी साहेबांचा जोश हाय! ऑपरेशन प्रहारचा धडाका; अवैध हत्यारे, दारू तस्करीवर कारवाई आणि चोरीतील ₹1.10 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकाला परत

सेवानिवृत्तीआधीच बीडीओ पवार भोवऱ्यात! चौकशी अहवाल चार महिन्यांपासून ‘गुलदस्त्यात’; नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?

“आज तो एकटा होता… उद्या तुमचीही पाळी येऊ शकते! : व्यापारी, राजकारण, समाज आणि पत्रकारितेचे आत्मपरीक्षण”

मुर्तिजापूर बंदमध्ये शांततेला गालबोट; समाजकंटकांवर वरिष्ठ अधिकारी ‘सु-मोटोचा’ कारवाईची करण्याचा तयारी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली? एक महिना उलटला, निंभा अतिक्रमण प्रकरणात कारवाई शून्य!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!