Join WhatsApp group

Ads

जोशी साहेबांचा जोश हाय! ऑपरेशन प्रहारचा धडाका; अवैध हत्यारे, दारू तस्करीवर कारवाई आणि चोरीतील ₹1.10 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकाला परत

By Sarkar Maza

July 25, 2026 1:19 pm

Ads

मुर्तिजापूर | प्रतिनिधी
अकोला जिल्हा पोलीस दलाच्या ‘ऑपरेशन प्रहार’ मोहिमेअंतर्गत मुर्तिजापूर शहर पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सलग प्रभावी कारवाया करत अवैध हत्यारे, अवैध दारू वाहतूक रोखण्यासोबतच चोरीतील जप्त मुद्देमाल मूळ फिर्यादीला परत देण्याचीही उल्लेखनीय कामगिरी केली आहे. या कारवायांमुळे गुन्हेगारीवर आळा घालण्याबरोबरच नागरिकांचा पोलिसांवरील विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र आहे.

दोन तलवारींसह तिघे जेरबंद; ₹14.32 लाखांचा मुद्देमाल जप्त

२४ जुलै रोजी रात्री कारंजा बायपास पुलाखाली गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी एमएच-30-सीबी-2964 क्रमांकाच्या इटिका वाहनावर छापा टाकला. वाहनचालक हरीष गिरीष खनेवार हा दारूच्या नशेत आढळून आला. त्याच्यासोबत निलेश बजरंग ठाकूर आणि पंकज बबन शेगावकर यांच्या ताब्यातून दोन विनापरवाना लोखंडी तलवारी जप्त करण्यात आल्या.

या कारवाईत दोन तलवारी, तीन मोबाईल फोन आणि इटिका कार असा ₹14.32 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरुद्ध आर्म्स अॅक्ट कलम 4/25 तसेच महाराष्ट्र मद्यनिषेध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

५०० देशी दारूच्या बाटल्या जप्त; एक आरोपी ताब्यात

याच दिवशी सायंकाळी कारंजा बायपास येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी एमएच-30-पी-1871 क्रमांकाची मारुती ओमनी तपासली असता त्यामध्ये ‘बॉबी संत्रा’ कंपनीच्या ९० मिलीच्या ५०० देशी दारूच्या सिलबंद बाटल्या आढळून आल्या.या प्रकरणात आकाश शिवप्रसाद तिवारी याला ताब्यात घेण्यात आले.

त्याच्याकडून ₹20 हजारांची दारू आणि ₹1 लाख किमतीची मारुती ओमनी असा ₹1.20 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपीविरुद्ध महाराष्ट्र मद्यनिषेध कायदा कलम 65(ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चोरीतील ₹1.10 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकाला परत

मुर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्र. 69/2021 अंतर्गत दाखल घरफोडी प्रकरणाचा तपास पूर्ण करून जप्त करण्यात आलेला मुद्देमाल न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर २५ जुलै २०२६ रोजी फिर्यादी शक्तीसिंग दिलीपसिंग ठाकूर (रा. आदर्श कॉलनी, मुर्तिजापूर) यांना परत करण्यात आला.परत करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये ४ ग्रॅम सोन्याची लगड (अंदाजे ₹60 हजार) आणि २०० ग्रॅम चांदीची लगड (अंदाजे ₹50 हजार) असा एकूण ₹1.10 लाखांचा ऐवज समाविष्ट आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली प्रभावी कामगिरी

या सर्व कारवाया पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या.

कारवाईत पोलीस निरीक्षक धर्मेंद्र जोशी, पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वानखेडे, मसपोउपनि उज्वला भाले, सहायक फौजदार सुरेश पांडे, सहायक फौजदार नंदकिशोर टिकार, पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दांदळे, पोलीस कॉन्स्टेबल गजानन खेडकर, पोलीस कॉन्स्टेबल सचिन दुबे, पोलीस कॉन्स्टेबल रोशन लकडे, पोलीस कॉन्स्टेबल नामदेव आडे आणि पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा येरमुले यांनी सहभाग घेतला.

यापैकी अवैध हत्यार प्रकरणाचा पुढील तपास सहायक फौजदार सुरेश पांडे, अवैध दारू वाहतूक प्रकरणाचा तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन दांदळे, तर चोरीतील मुद्देमाल परत करण्याची प्रक्रिया मसपोउपनि उज्वला भाले यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केली.

Related Article

गुरुपौर्णिमा आणि नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर मुर्तिजापूर तालुक्यात पुन्हा ‘दरबारां’ची गर्दी; श्रद्धेच्या नावाखाली अंधश्रद्धेला प्रोत्साहन?रेपारखेळ परिसरातील काही दरबारांकडे प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी

जोशी साहेबांचा जोश हाय! ऑपरेशन प्रहारचा धडाका; अवैध हत्यारे, दारू तस्करीवर कारवाई आणि चोरीतील ₹1.10 लाखांचा मुद्देमाल मूळ मालकाला परत

सेवानिवृत्तीआधीच बीडीओ पवार भोवऱ्यात! चौकशी अहवाल चार महिन्यांपासून ‘गुलदस्त्यात’; नेमके कोणाला वाचविण्याचा प्रयत्न?

“आज तो एकटा होता… उद्या तुमचीही पाळी येऊ शकते! : व्यापारी, राजकारण, समाज आणि पत्रकारितेचे आत्मपरीक्षण”

मुर्तिजापूर बंदमध्ये शांततेला गालबोट; समाजकंटकांवर वरिष्ठ अधिकारी ‘सु-मोटोचा’ कारवाईची करण्याचा तयारी?

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशालाही केराची टोपली? एक महिना उलटला, निंभा अतिक्रमण प्रकरणात कारवाई शून्य!

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!