Join WhatsApp group

Ads

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

By Sarkar Maza

July 18, 2026 12:38 pm

Ads

संपूर्ण महाराष्ट्रात गुटखाबंदी लागू असतानाही बोरगाव मंजू येथे आजही खुलेआम गुटखा विकला जात असल्याचे चित्र स्पष्ट आहे. पानटपऱ्या आणि इतर ठिकाणी सहज उपलब्ध होत असलेल्या या गुटख्याचा पुरवठा नेमका कुठून होतो? हा प्रश्न आता नागरिक विचारत आहेत.

अकोला एमआयडीसीमध्ये अलीकडेच बनावट गुटखा निर्मितीवर मोठी कारवाई झाल्यानंतर बोरगाव मंजूमध्ये विकला जाणारा गुटखा नेमका कुठून येतो? तो अधिकृत मार्गाने येतो की बेकायदेशीर साखळीद्वारे?

तसेच बोरगाव परिसरात कुठे बनावट गुटखा तयार केला जातो का?

अशा प्रश्नांची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात गुटखाबंदी असूनही जर प्रतिबंधित पदार्थ सहज उपलब्ध होत असतील, तर पुरवठा साखळीवर प्रभावी कारवाई का होत नाही, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

रफिक नामक व्यक्ती हा सध्या कोणाला न घाबरता राजरोस पणे जर व्यवसाय चालवत असेल आणि पोलिस स्टेशनचा हाकेच्या अंतरावर जर गुटखा विकल्या जात असेल या मुळे संशय अधिक बळकावतो.

अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभागाने संयुक्त मोहीम राबवून विक्री केंद्रे, साठे आणि पुरवठा साखळीची तपासणी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणावी, अशी मागणी होत आहे.

आता बोरगाव मंजूमधील गुटखा विक्रीवर संबंधित यंत्रणा किती प्रभावी कारवाई करतात, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Related Article

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!