Join WhatsApp group

Ads

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

By Sarkar Maza

July 18, 2026 3:03 pm

Ads

अकोला जिल्ह्यात बनावट गुटख्यानंतर आता नकली नोटांचे रॅकेट उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) केलेल्या धडक कारवाईत ₹९७ हजार किमतीच्या ५०० रुपयांच्या बनावट नोटा जप्त करत तिघा आरोपींना अटक केली आहे. या कारवाईमुळे जिल्ह्यात आणखी मोठे रॅकेट कार्यरत असल्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, गुडधी येथील चंदन भिमराव घांडोरे हा बनावट नोटा खऱ्या असल्याचा आभास निर्माण करून बाजारात चलनात आणण्याच्या तयारीत आहे. त्यानुसार पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन लेव्हरकर यांनी पथक तयार करून गुडधी परिसरात सापळा रचला.छाप्यात चंदन घांडोरे याच्याकडून ५०० रुपयांच्या २१ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

चौकशीत त्याने या नोटा मूर्तिजापूर येथील जहीरोद्दीन जबिरोद्दीन (पठाणपुरा) याच्याकडून घेतल्याची कबुली दिली.यानंतर LCB चे पथक तातडीने मूर्तिजापूरला पोहोचले. आसरा फाटा चौकातून जहीरोद्दीनला ताब्यात घेतले असता त्याच्याकडून ५०० रुपयांच्या तब्बल १७३ बनावट नोटा जप्त करण्यात आल्या.

पुढील चौकशीत जहीरोद्दीनने या नोटा गुडधी येथील विठ्ठल संजय वारोकार याच्याकडून घेतल्याचे सांगितले. पोलिसांनी विठ्ठलला ताब्यात घेतल्यानंतर त्याने या बनावट नोटा बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव येथील एका व्यक्तीकडून आणल्याची माहिती दिली.

तिघे आरोपी गजाआडचंदन भिमराव घांडोरे (गुडधी)जहीरोद्दीन जबिरोद्दीन (पठाणपुरा, मूर्तिजापूर)विठ्ठल संजय वारोकार (गुडधी)या तिघांविरुद्ध पोलीस स्टेशन सिव्हिल लाईन, अकोला येथे भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे.

‘डोणगाव कनेक्शन’वर पोलिसांची नजरप्राथमिक चौकशीत या बनावट नोटांचा स्रोत बुलढाणा जिल्ह्यातील डोणगाव असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या रॅकेटच्या मुळापर्यंत पोहोचण्यासाठी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

एकीकडे बनावट गुटखा, तर दुसरीकडे नकली नोटा… अकोला जिल्ह्यात गुन्हेगारीचे नवे जाळे उघड होत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

या कारवाईत सहभागी प्रमुख पोलीस अधिकारी व कर्मचारी:

पोलीस अधीक्षक: श्री. अर्चित चांडक

अपर पोलीस अधीक्षक: श्री. बी. चंद्रकांत रेड्डी

पोलीस निरीक्षक (स्थानिक गुन्हे शाखा): श्री. नितीन लेव्हरकर

सहाय्यक पोलीस निरीक्षक: निलेश देशमुख

सहाय्यक पोलीस निरीक्षक: गोपाल जाधव

पोलीस उपनिरीक्षक: माजीद पठाण

पोलीस उपनिरीक्षक: अनिल व्हव्हाण

कारवाईत सहभागी पोलीस कर्मचारी: शेख हसन, अब्दुल माजीद, महेंद्र मलीये, रवि खंडारे, किशोर सोनोने, भास्कर धोत्रे, खुशाल नेमाडे, मंगेश इंगळे, श्रीकांत पातोंड, अमोल दिपके, आकाश मानकर, अभिषेक पाठक, राज चंदेल, धीरज वानखेडे, कमलेश धर्माधिकारी, देवानंद खरात आणि प्रकाश लोखंडे.

Related Article

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!