Join WhatsApp group

Ads

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

By Sarkar Maza

July 18, 2026 11:48 am

Ads

अकोला एमआयडीसी फेज ३ व ४ मधील कथित बनावट गुटखा निर्मिती करणाऱ्या दोन कारखान्यांवर अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणावर मुद्देमाल जप्त करण्यात आला. या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असले, तरी या प्रकरणाने अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

स्थानिक स्तरावर सुरू असलेल्या चर्चेनुसार, या कथित रॅकेटची सुरुवात मूर्तिजापूर परिसरातून झाली, त्यानंतर बोरगाव परिसरात त्याचे जाळे विस्तारले आणि पुढे अकोला एमआयडीसीमध्ये उत्पादन सुरू झाल्याची कुजबुज सध्या जिल्ह्यात सुरू आहे.

मात्र, या दाव्यांची अधिकृत पुष्टी झालेली नसून तपासातूनच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, जर संबंधित कारखाने दीर्घकाळापासून सुरू होते, तर त्याची माहिती संबंधित यंत्रणांना आधी का मिळाली नाही?

कारवाईनंतर श्रेय घेण्यापेक्षा अशा बेकायदेशीर उद्योगांना इतका काळ संरक्षण किंवा दुर्लक्ष कसे मिळाले, याची चौकशी होणे आवश्यक असल्याची चर्चा शहरात सुरू आहे.

या प्रकरणात पोलिसांनी काही आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये काही बाहेरील राज्यातील युवकांचा तसेच अकोल्यातील काही व्यक्तींचा समावेश आहे.

मुख्य सूत्रधार म्हणून चर्चेत असलेल्या गौरव शर्मा याचा शोध सुरू असल्याचे अधिकृत सूत्रांनी सांगितले आहे. तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी मानता येणार नसल्याचे कायदेशीर वास्तव आहे.

गुटखा विक्री आणि बनावट उत्पादनाच्या व्यवसायातून काही जण अल्पावधीत आर्थिकदृष्ट्या सक्षम झाल्याची चर्चा अनेक वर्षांपासून होत होती. अशा परिस्थितीत स्थानिक गुप्त माहिती यंत्रणा, अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांकडे याबाबत कोणती माहिती होती का, हा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

या कारवाईनंतर केवळ कारखान्यावर छापा टाकून प्रकरण संपणार नाही, तर या संपूर्ण रॅकेटमागील आर्थिक साखळी, पुरवठादार, वितरक, आर्थिक लाभार्थी आणि इतर संबंधित व्यक्तींचाही तपास होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा कथित प्रवास नेमका कसा झाला, या संपूर्ण साखळीचा तपास आता यंत्रणांसमोर मोठे आव्हान ठरणार आहे.

Related Article

अकोल्यात ‘नकली नोटांचा’ मोठा खेळ उघड! LCB च्या धाडीत ९७ हजारांच्या बनावट नोटा जप्त; मूर्तिजापूर कनेक्शन समोर

गुटखाबंदीचा फज्जा? बोरगाव मंजूत आजही सर्रास गुटखा विक्री; बनावट गुटखा रॅकेटचा संशय, प्रशासन झोपेत?

मूर्तिजापूर–बोरगाव–अकोला असा बनावट गुटखा रॅकेटचा प्रवास? कारवाईनंतर अनेक प्रश्न अनुत्तरित

कारंज्यात पेट्रोल-डिझेल चोरीचा गोरखधंदा? नॅशनल ढाब्यावर टँकरमधून इंधन उतरविण्याची चर्चा; स्फोटाच्या धोक्याने नागरिकांमध्ये चिंता

बेटा नंबरी… बाप दस नंबरी? अकोल्यातील बनावट गुटखा रॅकेटवर सलग दुसरी धडक कारवाई! अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे ऑपरेशन प्रहार

अनभोरा गावात अवैध दारू विक्री पुन्हा चर्चेत? पूर्वी कारवाई झालेल्या व्यक्तींची नावे पुन्हा समोर; नागरिकांचा संताप, पोलिसांकडून कठोर कारवाईची मागणी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!