Join WhatsApp group

Ads

महाराष्ट्रातील बड्या नेत्यांच्या हस्ते होणार पक्षप्रवेश? ‘त्या’ कोहिनूर हिऱ्याच्या चेहऱ्याच्या एन्ट्रीने बदलणार शहराचे राजकीय समीकरण!

By Sarkar Maza

August 9, 2026 9:14 am

Ads

मूर्तिजापूर शहर :

सद्यःस्थितीला मूर्तिजापूर शहराच्या राजकारणात आणि समाजकारणात कमालीची शांतता पाहायला मिळत असली, तरी ही शांतता वादळापूर्वीची तर नाही ना, अशी जोरदार चर्चा सध्या चौकाचौकांत दबल्या आवाजात सुरू आहे. येत्या काही दिवसांत किंवा आठवड्यांत शहराच्या राजकीय पटावर एक मोठा फेरबदल पाहायला मिळण्याचे संकेत मिळत असून, काही नावाजलेल्या आणि सर्वसामान्यांच्या जवळच्या चेहऱ्यांचा राजकीय प्रवेश शहरात चर्चेचा विषय ठरत आहे.

जनमानसात स्थान असलेले नेतृत्व पुन्हा रणांगणात?

*ज्यांचे तळागाळातील जनतेशी थेट नाते आहे, ज्यांच्याबद्दल लोकांच्या मनात आदराचे आणि विश्वासाचे स्थान आहे, अशा काही समाजोपयोगी कार्य करणाऱ्या व्यक्तींचा धुमधडाक्यात राजकीय प्रवेश किंवा पुनरागमन येत्या काळात होणार असल्याचे सूत्रांकडून समजते. मग तो प्रवेश एखाद्या प्रस्थापित राजकीय पक्षातील पुढारी नेतृत्व असो की अपक्ष; नेतृत्व असो,या संभाव्य प्रवेशामुळे मूर्तिजापूरच्या राजकारणातील बरीच जुनी समीकरणे मोडीत निघून नवीन राजकीय समीकरणांची मांडणी होणार हे निश्चित मानले जात आहे.

*शहराच्या विकासासाठी अनुभवी चेहऱ्यांची गरज*

आज काही प्रभावी चेहरे राजकारणात सक्रिय नाहीत—न ते सत्तेत आहेत, न विरोधी पक्षात. परंतु, त्यांनी भूतकाळात केलेल्या सामाजिक आणि विकासात्मक कार्याचा आलेख पाहिला असता, तर अशी खंबीर नेतृत्वे राजकारणापासून दूर राहणे म्हणजे मूर्तिजापूर शहराच्या विकासाची वाटचाल कुठेतरी खुंटण्यासारखे आहे.अशी नेतृत्वे पदे किंव्हा सत्तेपलीकडे जाऊन शहरासाठी तळमळ असणारी , जनतेच्या हाकेला धावून जाणारे हे नेतृत्व सध्या जरी वैयक्तिक आयुष्यात व्यस्त असले, तरी सध्याच्या राजकीय परिस्थितीत पक्षांनाही अशाच सक्षम आणि ‘उमद्या’ नेतृत्वाची गरज आहे.

“कोळशाच्या खाणीत जशी हिऱ्याची परक होते”

त्याचप्रमाणे *”काळोख्याच्या ठीकानी हिरा आपल्या प्रकाशाने आपली उपस्थिती त्या ठिकाणी दर्शवितो”* *” परिस्थिती अनुरूप खऱ्या हिऱ्याची पारख होत असतें “* या उक्तीप्रमाणे, विविध राजकीय पक्ष सध्या जनमानसात पकड असलेल्या प्रभावी चेहऱ्यांच्या शोधात आहेत, जेणेकरून राजकीय पक्षासोबतच शहराच्या विकासालाही गती मिळू शकेल. ही चढाओळ किंवा प्रामाणिक इच्छाशक्ती आज राजकीय पक्षात पाहायला मिळत आहे.

*राजकीय चित्रात मोठ्या बदलाची शक्यता*

जर अशा अनुभवी आणि जनतेच्या पसंतीस उतरलेल्या नेतृत्वाचा राजकारणात सक्रिय सहभाग झाला, तर मूर्तिजापूर शहरातील राजकीय स्थिती पूर्णपणे पालटून जाईल असा कयास बांधला जात आहे. आगामी दिवसांत होणारा हा राजकीय फेरबदल शहराला कोणत्या दिशेने घेऊन जातो आणि यामुळे कोणाचे गणित बिघडतात व कोणाला फायदा होतो, याकडे संपूर्ण मूर्तिजापूरकरांचे लक्ष लागून राहिले आहे…

Related Article

रक्त लोकांचे, सिस्टीम सरकारची आणि उदो-उदो स्वतःचे! रक्तदान शिबिर सामाजिक कार्य राहिले की राजकीय एन्ट्रीचा नवा ‘पॉइंट’?

रोहणा बॅरेज प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना ५ कोटींच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वितरित

कारवाई झाली, पण मुख्यालयात ‘सवलत’? ११ शिक्षकांवरून प्रश्नचिन्ह

आंतरराष्ट्रीय युवा दिनानिमित्त मूर्तिजापुरात ‘रेड रन मॅरेथॉन २०२६’आरोग्यदायी जीवनशैली आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी युवकांचा सहभाग

अण्णाभाऊ साठे चौकाचा फलक सुरक्षित राहावा; अकोला जिल्हा मातंग समाजातर्फे प्रशासनाला शांततापूर्ण मार्गाने निवेदन*

रात्री-दिवसा घरफोड्या करणाऱ्या सराईत आरोपींच्या मुसक्या आवळल्या! मूर्तिजापुरात तब्बल ७ घरफोड्या उघड.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!