Join WhatsApp group

Ads

भररस्त्यात तरुणीचा विनयभंग — पोलिसांची तात्काळ कारवाई

By Sarkarmzanews

January 3, 2026 8:03 pm

Ads

अकोला : दिनांक ०३ : शहरात एकतर्फी प्रेमातून तरुणीचा सातत्याने पाठलाग करून तिचा छळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

तब्बल तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या त्रासाला कंटाळून अखेर पीडित तरुणीने खदान पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

तक्रारीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, २४ वर्षीय तरुणी कामानिमित्त दररोज शहरात ये-जा करत असते. आसिफ (वय ४५) असे आरोपीचे नाव असून तो दीर्घकाळापासून तिचा पाठलाग करत होता.

सुरुवातीला मोबाईलवरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्यानंतर तरुणीने त्याचा नंबर ब्लॉक केला. मात्र त्यानंतरही आरोपीचा त्रास थांबला नाही. तो तरुणी ज्या दुकानात काम करत होती तेथेही वारंवार येऊ लागला.

दुकानाबाहेर उभे राहून अश्लील इशारे करणे, वाटेत मुद्दाम अडवणे असे प्रकार सातत्याने सुरू होते. त्यामुळे तरुणी मानसिक तणावाखाली होती.नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी आरोपीने कळस गाठला.

भररस्त्यात तरुणीला अडवत “नववर्षाची भेट द्यायची आहे” असे सांगून त्याने तिच्याशी वाद घातला आणि जबरदस्तीने हात धरत विनयभंग केला, असा गंभीर आरोप तक्रारीत नमूद आहे.

या प्रकारावेळी काही नागरिकांनी हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला. घाबरलेली तरुणी थेट खदान पोलीस ठाण्यात दाखल झाली आणि संपूर्ण घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

तरुणीच्या जबाबावरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून हा छळ गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असल्याची नोंद तपासात करण्यात आली आहे.

घटनेच्या वेळी उपस्थित असलेल्या एका सामाजिक कार्यकर्त्यानेही तरुणीला मदत केल्याचे सांगितले जाते.दरम्यान, या घटनेला काहींकडून धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न होत असला तरी पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की हा प्रकार महिलांचा छळ व विनयभंगाचा गंभीर गुन्हा असून याकडे कायद्याच्या चौकटीतूनच पाहिले जाईल.

आरोपीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले.सध्या आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडी मिळवण्यात आली असून पुढील तपास खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार मनोज केदारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती केली जात असतानाही अशा घटना समोर येत असल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. एकतर्फी प्रेमाच्या नावाखाली होणाऱ्या छळाविरोधात समाजानेही अधिक सजग राहण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!