Join WhatsApp group

Ads

हायवे ओलांडताना अचानक कारसमोर आला बालक; अपघातात ११ वर्षीय रौनकचा मृत्यू

By Sarkarmzanews

October 1, 2026 8:32 pm

Ads

मूर्तीजापूर : अमरावतीहून मूर्तीजापूरकडे येत असताना कोहिनूर बारसमोर हायवेवर रस्ता ओलांडणाऱ्या ११ वर्षीय सैय्यद रौनक सैय्यद अल्ताफ मदारी याला मारुती स्विफ्ट कारची धडक बसल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत बालकाचे नाव सैय्यद रौनक सैय्यद अल्ताफ मदारी, रा. नवीन घरकुल, मूर्तीजापूर असे आहे.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मारुती स्विफ्ट क्रमांक MH 30 BW 1866 ही कार अमरावतीकडून मूर्तीजापूरकडे येत होती. त्याचवेळी सैय्यद रौनक हा हायवेवर रस्ता ओलांडत असताना तो अचानक वाहनासमोर आल्याने स्विफ्टची त्याला धडक बसली अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे.

या अपघातात रौनक गंभीर जखमी झाला.अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने सैय्यद रौनक याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले.अपघातग्रस्त स्विफ्ट वाहनाच्या मालकाने पोलिसांना घटनेची माहिती दिल्याचे सांगण्यात येत आहे.

प्राथमिक माहितीनुसार वाहन चालविणाऱ्या व्यक्तीचे नाव डॉ. भोरे रा. मूर्तीजापूर असल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, अपघात नेमका कसा घडला, वाहनाचा वेग किती होता तसेच चालकाची भूमिका याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. अधिकृत तपासानंतरच अपघाताची नेमकी परिस्थिती स्पष्ट होणार आहे.

Related Article

कबड्डीची ऐतिहासिक परंपरा जपण्यासाठी माई सोशल बहुउद्देशीय क्रीडा मंडळाचा व कै. मारुती आप्पा पिंपळे संस्था यांचा पुढाकार

“तुम्ही पूर्ण गावाला लुटलं आहे”; MSEDCL अधिकाऱ्याच्या वक्तव्यावर Solar Vendorची तक्रार

मूर्तिजापुरात मोबाईल रिपेअरिंग दुकान फोडले; दोन आयफोनसह ७५ हजारांची रोकड लंपास

२८ सप्टेंबर हा दिवस “माहिती अधिकार दिन” म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने या लक्षवेधी कायद्याविषयी थोडक्यात माहिती…

शिवण खुर्दमध्ये शहीद भगतसिंग जयंती उत्साहातशहीद भगतसिंग क्रीडांगणाचे उद्घाटन; तरुणाईला मिळाले हक्काचे क्रीडा व्यासपीठ

🌡️ सुपर एल निनोचा इशारा! जगभरात 4.51 लाख अतिरिक्त मृत्यूंची शक्यता; भारतालाही मोठा धोका

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!