Join WhatsApp group

Ads

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

By Sarkarmzanews

October 13, 2026 6:14 pm

Ads

अकोला : बाळापूर येथील माजी आमदार नतिकुद्दीन खतीब यांच्या निवासस्थानी कोयत्यासह हल्ल्याचा प्रयत्न झाल्याच्या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी, हल्ल्यामागील कथित सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि खतीब कुटुंबाला पोलीस सुरक्षा द्यावी, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मंगळवारी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी कार्यकर्ते एसपी कार्यालयात दाखल झाले.

मात्र, निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना कार्यालयाच्या प्रवेशद्वारावरच रोखण्यात आल्याने वंचितच्या पदाधिकाऱ्यांनी या प्रकाराचा निषेध केला.वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांपैकी केवळ पाच जणांनाच पोलीस अधीक्षकांकडे जाण्याची परवानगी देण्यात आली.

खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार घुगे यांनी कार्यकर्त्यांना अडविल्याचा आरोप पदाधिकाऱ्यांनी केला आहे.या प्रकारामुळे नाराज झालेल्या वंचितच्या कार्यकर्त्यांनी पोलीस अधीक्षकांची प्रत्यक्ष भेट न घेता आपले निवेदन आवक-जावक विभागात जमा केले. कार्यकर्त्यांना रोखण्याच्या प्रकाराचा त्यांनी निषेध केला.

ठाणेदारांच्या भूमिकेवर प्रदेशाध्यक्षांचा सवाल

या घटनेवर वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष राजेंद्र पातोंडे यांनी प्रश्न उपस्थित केला. पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची संख्या ठरविण्याची भूमिका खदान पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी का घेतली, असा सवाल त्यांनी केला.

“एसपी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांची गिनती करण्याचे कारण काय? त्यांना अडविण्याचे निर्देश कुणाचे होते? खदान पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांचा एसपी कार्यालयातील या व्यवस्थेशी नेमका संबंध काय?” असे प्रश्न उपस्थित करण्यात आले.

खतीब यांच्या निवासस्थानी झालेल्या कथित हल्ल्याच्या प्रकरणात सर्व बाजूंनी निष्पक्ष तपास व्हावा, अशी मागणी करताना या घटनेत खदान पोलीस ठाण्याचे ठाणेदार घुगे यांची काही भूमिका किंवा संबंध आहे का, याचीही आवश्यक असल्यास चौकशी करावी, अशी मागणी वंचितकडून करण्यात आली.

“अवैध धंदेही मोजून दाखवावे लागतील”

दरम्यान, खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कथित अवैध धंद्यांचा मुद्दाही वंचित बहुजन आघाडीने उपस्थित केला. “आमच्या कार्यकर्त्यांची गिनती केली जात असेल, तर आगामी काळात खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या कथित अवैध धंद्यांचीही माहिती मोजून ठाणेदारांना दाखवावी लागेल,” असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.

मात्र, खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंदे सुरू असल्याच्या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नाही. त्यामुळे या आरोपांबाबत पोलीस प्रशासनाची महत्त्वाची ठरणार आहे.

आरोपीच्या अटकेची मागणी

दरम्यान, माजी आमदार नतिकुद्दीन खतीब यांच्या बाळापूर येथील निवासस्थानी कोयत्यासह हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करावी, हल्ल्यामागील कथित सूत्रधारांचा शोध घ्यावा आणि दोषी आढळणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

तसेच माजी आमदार नतिकुद्दीन खतीब, त्यांचे पुत्र ऐनबुद्दीन खतीब आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेचा आढावा घेऊन आवश्यक ती पोलीस सुरक्षा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.

आता हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांकडून कोणती कारवाई होते, तसेच एसपी कार्यालयात कार्यकर्त्यांना रोखण्याच्या प्रकाराबाबत पोलीस प्रशासन काय स्पष्टीकरण देते, याकडे लक्ष लागले आहे.

Related Article

माजी आमदार खतीब हल्ला प्रकरणी पोलिसांवर दबावाचा आरोप; वंचितने उपस्थित केले गंभीर प्रश्न आता खदान पोलिस स्टेशनचे अवैध धंदे मोजण्याची वेळ आली आहे?

अकोल्यात ‘TP’चा खेळ?जड वाहनांना प्रवेशबंदीचे फलक; तरीही दिवसा टिप्परची एन्ट्री! काचेवरील कोडचे गूढ काय?

नाकाबंदीत कोयत्याची झलक,पोलीस कॉन्स्टेबल भूषण सोळंके यांच्या सतर्कतेला सलाम

मूर्तिजापूरच्या मातीतून विश्वाच्या संगणक विश्वापर्यंत!डॉ. विजय भटकर यांचा वाढदिवस म्हणजे केवळ एका वैज्ञानिकाचा गौरव नव्हे; तो मूर्तिजापूरच्या मातीच्या बुद्धिमत्तेला, जिद्दीला आणि स्वप्नांना सलाम करण्याचा दिवस

SDPO सुदर्शन प्रकाश पाटील यांच्या ‘ऑपरेशन प्रहार’चा दणका; अवैध पेट्रोल-डिझेल विक्रीवर छापा

तुषार सायानी यांच्या संशयास्पद अपघाताची सखोल चौकशी करा!लोकस्वातंत्र्य पत्रकार महासंघाचे पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांना निवेदन;

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!