Join WhatsApp group

Ads

--

स्वच्छतेच्या नावाखाली कामचोरी! QR कोड प्रकरणावर नगराध्यक्षांची कारवाई कधी?

By Sarkarmzanews

January 5, 2026 8:44 am

Ads

मुर्तिजापूर: दिनांक ०५ : स्वच्छ महाराष्ट्र अभियान अंतर्गत नागरिकांच्या घरांवर लावलेल्या QR कोडचा गैरवापर करत आरोग्य विभाग कचरा न उचलताच केवळ स्कॅन करून कागदोपत्री स्वच्छता दाखवली जात असल्याचा गंभीर प्रकार रोज सकाळी दिसत आहे.

या प्रकरणाकडे आता नवनिर्वाचित नगराध्यक्षांचे लक्ष जाणार का? असा सवाल शहरवासीयांकडून उपस्थित केला जात आहे.

आरोग्य विभागातील एकच कर्मचारी दररोज सकाळी घराघरात QR कोड स्कॅन करताना दिसत आहे, मात्र प्रत्यक्ष कचरा संकलन होत नसल्याच्या चित्र स्पष्ट आहे.

नियमांनुसार कचरा उचलल्यानंतरच QR कोड स्कॅन करणे बंधनकारक असताना, हे नियम धाब्यावर बसवले जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे.

या गंभीर बाबीवर ‘सरकार माझा न्यूज’ने यापूर्वीच बातमी प्रसारित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. मात्र कारवाई ऐवजी आता या प्रकरणावर आरोग्य विभागा कडून फसवेगिरी करण्याचा प्रयत्न होत आहे, प्रशासनानेच तोडगा म्हणून ‘नवीन शक्कल’ लढवली असल्याचा चित्र दिसतआहे.

नागरिकांची अपेक्षा आहे की, नवनिर्वाचित नगराध्यक्ष स्वतः या प्रकरणाची दखल घेऊन आरोग्य विभागाची चौकशी करतील, दोषींवर तातडीने कारवाई करतील व QR कोड प्रणालीचा योग्य वापर सुनिश्चित करतील का?

अन्यथा स्वच्छ महाराष्ट्र अभियान केवळ कागदावरच उरेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!