Join WhatsApp group

Ads

एसबीआय एटीएममध्ये महिलेला २४ हजार ७०० रुपयांचा गंडा! अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

November 7, 2025 9:54 pm

Ads

मुर्तिजापूर : ०७ नोव्हें.२५ : शहरातील स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय) एटीएममध्ये एका महिलेला अनोळखी इसमाने चलाखीने फसवून तब्बल ₹24,700 रुपये काढल्याची धक्कादायक घटना आज (दि. ७ नोव्हेंबर) घडली असून या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी सौ. बेबी मधुकर खंडारे (वय 44, राजुरा घाटे, ता. मुर्तिजापूर) या शिलाई मशिन दुरुस्ती व खरेदीसाठी मुर्तिजापूर येथे आल्या होत्या. त्या एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेल्या असता एटीएममध्ये अडचण आल्याने त्यांनी बाजूलाच उभ्या असलेल्या एका अनोळखी इसमाची मदत मागितली.

त्या इसमाने फिर्यादीचे एटीएम कार्ड घेऊन मशीनमध्ये टाकले व पिन टाकण्यास सांगितले. फिर्यादीने त्याच्यासमोर पिन टाकला. त्यानंतर त्या इसमाने एटीएम बाहेर काढून तिच्या हातात दुसरे कार्ड देत सांगितले की “तुमचे कार्ड लॉक झाले आहे”.

थोड्याच वेळात, बँकेत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर फिर्यादींच्या मोबाईलवर खात्यातून ₹24,700 रुपयांची कपात झाल्याचा मेसेज आला. त्यानंतर लक्षात आले की अनोळखी इसमाने कार्डची अदलाबदल करून फसवणूक केली आहे.

या प्रकरणी पोलीस स्टेशन मुर्तिजापूर शहरात अप क्र. 491/2025, कलम 318(2) भा.न्या.संहिता 2023 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास PSI सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली WASI उज्वला भाले करत आहेत.

पोलीसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, एटीएममध्ये पैसे काढताना अनोळखी व्यक्तींची मदत घेऊ नये व पिन क्रमांक कोणालाही सांगू नये.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!