Join WhatsApp group

Ads

शेतात जात असलेल्या महिलेला रस्त्यावर अडवून मारहाण; चंदू ठाकूरविरुद्ध गुन्हा दाखल

By Sarkarmzanews

July 20, 2025 8:31 pm

Ads

मुर्तिजापूर, २० जुलै (प्रतिनिधी): कासवी शिवारात एका महिलेला रस्त्यात अडवून छेडछाड करत काठीने मारहाण केल्याची घटना आज सकाळी घडली. या प्रकरणी चंदू राधेश्याम ठाकूर (वय ५५, रा. कासवी) याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महिला (वय ३६, व्यवसाय-शेती, रा. कासवी, ता. मुर्तिजापूर) या आपल्या शेताकडे जात असताना, रहाटे गुरुजी यांच्या शेताजवळ आरोपी चंदू ठाकूर याने त्यांचा पाठलाग करत अश्लील शब्दांत बोलून हात पकडला व जबरदस्तीने रस्त्याच्या बाजूला घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. विरोध केला असता, त्याने हातातील काठीने मारहाण करून गंभीर दुखापत केली व जीवे मारण्याची धमकी दिली.

ही घटना १९ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:३० वा. दरम्यान घडली. यासंदर्भातील तक्रार त्याच दिवशी सायंकाळी ४:१९ वा. दाखल करण्यात आली. वैद्यकीय अहवाल व जबाबाच्या आधारे आरोपीविरुद्ध भादंवि नुसार नव्याने अस्तित्वात आलेल्या भारतीय दंड संहिता (BNS) च्या कलम 74, 75, 78, 118(1), व 351(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा तपास हेडकॉन्स्टेबल इरफानोद्दीन (ब. नं. 1336, मोब. 9822803835) करीत असून, गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया HC गोपालसिंग ठाकूर (ब. नं. 1632) यांनी पार पाडली.

ही घटना ग्रामीण भागात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आणणारी असून, पोलिसांनी तत्काळ गुन्हा दाखल करून तपास सुरू केल्यामुळे नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!