Join WhatsApp group

Ads

कोणत्या पक्षाला किती मंत्रीपदं मिळणार?

By Sarkarmzanews

December 7, 2024 9:36 am

Ads

मुंबई : दिनांक ०७ : विधानसभेच्या एकूण संख्याबळाच्या 15 टक्के मंत्रिमंडळाचा आकार असण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात 43 जणांचा समावेश होऊ शकतो. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिघांचा शपथविधी पार पडला आहे. त्यामुळे आता मंत्रिमंडळात केवळ 40 जणांची जागा शिल्लक आहे. या 40 खात्यांमध्ये तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना सामावून घेण्याची कसरत महायुतीला करावी लागणार आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला सर्वाधिक 21 ते 22 मंत्रि‍पदे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे  एकनाथ शिंदे आणि अजितदादा गटाला नेमकी किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार, याची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!