Join WhatsApp group

Ads

-

दारू कुठून येते? कोण पाठिंबा देतो? किनखेड येथील अवैध दारू व्यवसायावर अनेक प्रश्नचिन्हे

By Sarkarmzanews

January 8, 2026 9:33 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक ०८ : मुर्तिजापूर तालुक्यातील किनखेड या छोट्याशा गावात अवैधरीत्या दारूचा व्यवसाय फोफावल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुलताने नामक युवकाने अधिक पैसा कमावण्याच्या नादात शासनाला चुना लावण्याचा प्रकार सुरू केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा युवक देशी दारू व वाईन शॉपीत ज्या दराने दारू मिळते, त्याच दरात गावात बेकायदेशीरपणे दारू विक्री करत आहे. त्यामुळे ही दारू डुप्लिकेट तर नाही ना, असा संशय ग्रामस्थांच्या मनात निर्माण झाला आहे.

किरकोळ नव्हे तर थेट होलसेल स्तरावर दारूचा धंदा सुरू असल्याचा आरोप आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, प्रशासनाने तपास केल्यास दिव-दमन येथून या युवकाकडे दारू येत असल्याचे उघड होऊ शकते. एका ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून कारंजा मार्गे हा दारूचा माल आणला जातो, अशीही माहिती पुढे आली आहे.

धक्कादायक बाब म्हणजे, देशी दारूचा सीलबंद क्वार्टर तो ९०च्या बाटलीत भरून ग्राहकांना विकतो. तसेच इंग्लिश चा कॉटर सुद्धा देशाच्या बाटलीमध्ये भरून देतो.

त्याच्याकडे पार्सलची कोणतीही सुविधा असून सीलबंद बाटली का विक्री करत नाही? गावकऱ्यांना फक्त “घरी पिण्यासाठी” अशी तोंडी परवानगी दिली जाते, असा प्रकार सुरू आहे.

या संपूर्ण प्रकरणामागे मुर्तिजापूर शहरातील बायपासवरील एका देशी दारू विक्रेत्या दुकानदाराचे नावही चर्चेत असल्याने संशय अधिक गडद झाला आहे.

ही दारू नेमकी कुठून येते? तिची गुणवत्ता काय आहे? तसेच गावकऱ्यांना ही दारू पिऊन काही कमी-जास्त झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. शासनाचा महसूल बुडवणाऱ्या या अवैध धंद्याला पाठिंबा देणारे नेमके कोण? हाही प्रश्न ग्रामस्थ विचारत असून या युवकावर संशयाची सुई अधिक गडद झाली आहे.

दरम्यान, या अवैध दारू व्यवसायामुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. संबंधित उत्पादन बनावट किंवा निकृष्ट दर्जाचे असल्यास गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

त्यामुळे संबंधित आबकारी व पोलिस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून सखोल चौकशी करावी व कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!