Join WhatsApp group

Ads

विझोरा येथे अज्ञात चारचाकीची धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू, आरोपी बोलेरो चालक ताब्यात : बार्शीटाकळी पोलिसांची कारवाई • अपघातातील वाहन व चालकाचा शोध लावण्यात यश

By Sarkar Maza

March 8, 2026 8:46 am

Ads

अकोला : अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवार (६ मार्च) रोजी दुपारी विझोरा–कातखेड मार्गावर घडली होती. या प्रकरणात बार्शीटाकळी पोलिसांनी तपास करून अपघातास कारणीभूत ठरलेले वाहन व चालकाचा शोध लावून त्याला ताब्यात घेतले आहे.

या अपघातात रंजित जगदेव चक्रे (वय ४२, रा. बाभूळगाव जहागीर) यांचा मृत्यू झाला होता. रंजित चक्रे हे विझोरा येथून एमएच ३० एएम ९४६६ क्रमांकाच्या दुचाकीने एमआयडीसीकडे जात असताना मलकापूर मार्गे विझोरा गावाकडे भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत चक्रे यांचा जागीच मृत्यू झाला.

photo – Ai genrated

घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अकोला येथील सर्वोपचार रुग्णालयात पाठविला होता.

दरम्यान, ठाणेदार धुमाळ यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अपघातातील वाहनाचा शोध घेतला. तपासादरम्यान बोलेरो Maxx Pickup (क्रमांक MH 30 BD 0606) हे वाहन अपघातास कारणीभूत असल्याचे निष्पन्न झाले. या वाहनाचा चालक अजय देविदास हाडसे (वय २६, रा. क्रांतीनगर, शिवणी, अकोला) याला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

दरम्यान, रंजित चक्रे यांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या आठ वर्षांच्या मुलीचे अवघ्या तीन महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. त्यानंतर आता रंजित यांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांवर दुहेरी शोककळा पसरली आहे.

पोलीस पुढील तपास करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!