Join WhatsApp group

Ads

नर्स सोबत लव्ह स्टोरीचा ट्रॅजिक ट्विस्ट; डॉक्टर टोकाच्या पावलावर : 10 बिअर, 45 गोळ्या गट्टम; जीवन संपवण्याचा थरारक प्रयत्न

By Sarkar Maza

February 25, 2026 7:04 am

Ads

डोंबिवली : दिनांक २५ : प्रेमासाठी माणूस कोणत्याही थराला जाऊ शकतो असं म्हटलं जातं. प्रेम कोणाला कोणावर होईल याचाही काही नेम नसतो. असाचा काहीसा प्रकार आता मुबंईतील डोंबिवलीत घडला आहे. डोंबिवली शहरात एका नामांकित डॉक्टरने प्रेमप्रकरणातून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. स्वतःचे सुसज्ज हॉस्पिटल आणि सुखी संसार असताना, केवळ एका नर्सच्या प्रेमाखातर आणि तिने धरलेल्या अबोल्यामुळे हताश होऊन डॉक्टरने जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे वैद्यकीय क्षेत्रासह शहरात मोठी चर्चा रंगली आहे.

सुखी संसाराला लागली नजर

या प्रकरणातील डॉक्टर आणि त्यांची पत्नी दोघेही उच्चशिक्षित असून डोंबिवलीत त्यांचे स्वतःचे मोठे हॉस्पिटल आहे. मात्र, काही काळापासून या डॉक्टरांचे त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या एका नर्ससोबत प्रेमसंबंध जुळले होते. या विवाहबाह्य संबंधांमुळे पती-पत्नीमध्ये वारंवार खटके उडू लागले. वादाचे स्वरूप इतके वाढले की, डॉक्टरांनी आपल्या पत्नीचा आणि घराचा त्याग करण्याचा निर्णय घेतला. ते डोंबिवली पूर्वेकडील एका हायफाय सोसायटीत भाड्याने घर घेऊन स्वतंत्र राहू लागले.

लग्नाचा तगादा आणि टोकाचे पाऊल

घटनेला कलाटणी तेव्हा मिळाली जेव्हा संबंधित नर्सने डॉक्टरांकडे लग्नासाठी तगादा लावला. “माझे आधीच लग्न झाले आहे, मी तुझ्याशी पुन्हा लग्न कसे करू?” असे डॉक्टरांनी स्पष्ट केल्यावर संतापलेल्या नर्सने त्यांच्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले. ज्या नर्ससाठी सुखी संसारावर तुळशीपत्र ठेवले, तिनेच आता पाठ फिरवल्याने डॉक्टर मानसिक तणावात गेले. याच नैराश्यातून त्यांनी राहत्या घरी १० बिअर प्यायल्या आणि तब्बल ४५ झोपेच्या गोळ्यांचे सेवन करून जीवनप्रवास संपवण्याचा प्रयत्न केला.

कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे वाचले प्राण

डॉक्टर वेळेवर हॉस्पिटलमध्ये न पोहोचल्याने कर्मचाऱ्यांना शंका आली. त्यांनी तातडीने डॉक्टरांच्या निवास्थानी धाव घेतली. दरवाजा उघडला असता डॉक्टर बेशुद्धावस्थेत आढळले. त्यांना तातडीने उपचारासाठी दाखल करण्यात आले.

सुदैवाने, वेळेवर उपचार मिळाल्याने सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विष्णूनगर पोलीस करत आहेत.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!