Join WhatsApp group

Ads

-

आज जिजाऊ जयंती छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कचरा, दारूच्या बाटल्या; प्रशासन झोपेतच?

By Sarkarmzanews

January 12, 2026 10:25 am

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १२:मुर्तिजापूर शहरात राजमाता जिजाऊ जयंती निमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे दरवर्षी मोठ्या उत्साहात व गाजावाजात कार्यक्रम पार पडत आहे. शहराची ओळख असलेला हा चौक उत्सवाच्या दिवशी प्रकाशझोतात झळकतो, मात्र दररोज येथील वास्तव चित्र अत्यंत विदारक असल्याचे दिसून येत आहे.

सध्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात कचरा, प्लास्टिक साहित्य, उरलेले खाद्यपदार्थ यासोबतच दारूच्या बाटल्या उघड्यावर पडलेल्या आढळून येत आहेत. पवित्र व ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचे चित्र दिसणे ही अत्यंत खेदजनक बाब असून यामुळे नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत.

या प्रकाराकडे नगरपरिषद प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान व कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक व समाजसेवकांकडून होत आहे.

त्या स्थळाची स्वच्छता व शिस्त राखणे ही प्रशासनाची व समाजाची संयुक्त जबाबदारी आहे.

छत्रपती शिवाजी महाराज चौक हा शहराचा अभिमान आहे. तो स्वच्छ, सुरक्षित व संस्कारित ठेवण्यासाठी प्रशासन, सामाजिक संस्था व नागरिकांनी पुढाकार घेण्याची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!