Join WhatsApp group

Ads

मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्यात चोरी, गोवंश तस्करी व लैंगिक शोषणाचे तीन गुन्हे दाखल

By Sarkarmzanews

January 19, 2026 9:53 am

Ads

मुर्तीजापूर (दिनांक १९):मुर्तीजापुर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वेगवेगळ्या स्वरूपाच्या तीन गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, चोरी, गोवंश तस्करी तसेच लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण अशा घटनांनी शहरात खळबळ उडाली आहे.पहिल्या घटनेत अप. क्र. 66/2026 अन्वये कलम 305, 331(4) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी संतोष गंगाराम उंबरकर (वय 52, रा. टेलिफोन कॉलनी, स्टेशन विभाग, मुर्तीजापूर) हे कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराच्या लोखंडी गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून सुमारे 1 लाख 36 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार आहे. सदर घटना दि. 17/01/2026 सकाळी 11 ते दि. 18/01/2026 सकाळी 8 वाजेदरम्यान घडली असून आरोपी अज्ञात आहे.

दुसऱ्या प्रकरणात

अप. क्र. 67/2026 अंतर्गत महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम व प्राणी निर्दयता प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली आहे. दि. 18/01/2026 रोजी दर्यापूर नाका येथे नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी टाटा एस वाहनातून कत्तलीसाठी अवैधरित्या नेले जाणारे दोन गोवंशीय बैल जप्त केले.

आरोपी दसदीक पटेल अब्दुल तहीर (वय 19, रा. टाकळी पूर्णा, ता. दर्यापूर) याला अटक करण्यात आली. बैलांना निर्दयतेने बांधून ठेवण्यात आल्याचे आढळून आले असून सुमारे 3 लाख 60 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंशीय जनावरे पुढील संगोपनासाठी गौरक्षण संस्थेकडे सुपूर्द करण्यात आली आहेत.

तिसऱ्या घटनेत

अप. क्र. 68/2026 अन्वये कलम 69 BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी मोनिका भागवत जाधव (वय 26, रा. प्रियंका नगर, मुर्तीजापूर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी मयूर गोकूळ जाधव (वय 22, रा. भटोरी नाका, मुर्तीजापूर) याने लग्नाचे आमिष दाखवून दीर्घकाळ शारीरिक संबंध ठेवले.

गर्भधारणा झाल्यानंतर आरोपीने लग्नास नकार दिल्याने दि. 18/01/2026 रोजी सदर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.तिन्ही प्रकरणांचा तपास HC श्याम मडावी करीत असून गुन्हे दाखल करण्याची कारवाई WHC/HC शालिनी सोळंके यांनी केली आहे. पुढील तपास सुरू आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!