Join WhatsApp group

Ads

जुने शहर पोलिसांची कामगिरी चमकली; नागरिकांत समाधानाची भावना, तांत्रिक पुरावा नसतानाही पोलिसांचा तपास यशस्वी

By Sarkar Maza

February 21, 2026 3:44 pm

Ads

अकोला (२१ फेब्रुवारी २६ ) – सागर कॉलनी, वाशिम बायपास परिसरातील घरफोडी प्रकरणाचा जुने शहर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत छडा लावत तब्बल २१ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली असून चोरीतील सर्व सोन्याचे दागिने व मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे.
दि. १३/०२/२०२६ रोजी नेहा राजेश सावदेकर (वय ३०, रा. सागर कॉलनी, अकोला) यांनी पोलीस स्टेशन जुने शहर येथे फिर्याद दाखल केली. १२/०२/२०२६ रोजी त्या कामानिमित्त घराबाहेर गेल्या असताना अज्ञात इसमांनी त्यांच्या घरातून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा मुद्देमाल लंपास केला होता. यामध्ये सोन्याचे नेकलेस, अंगठ्या, पोत, ब्रेसलेट तसेच ९० हजार रुपये रोख असा एकूण मोठा ऐवज चोरीला गेला होता. याप्रकरणी गुन्हा क्रमांक ३८६/२०२६ कलम ३०५ भा.दं.सं. अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.


प्राथमिक तपासात कोणताही ठोस तांत्रिक पुरावा मिळत नसतानाही पोलिसांनी संशयितांच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवले. तपासादरम्यान समिक्षा अनिल गवई हिने आपल्या जुन्या परिचितांना अकोल्यात बोलावून चोरीतील मुद्देमाल लपविण्याचा प्रयत्न केल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी अमरावती येथे सापळा रचून ऋतिक अजाबराव श्रृंगारे (वय २२), समीर प्रदीप तेलखडे (वय १९) यांना ताब्यात घेतले. पुढील चौकशीत वैभव संजय गोपनारायण (वय २३) याचाही सहभाग उघड झाला.
चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्यांच्या ताब्यातून सुमारे १३८ ग्रॅम सोन्याचे दागिने, ज्यांची अंदाजे किंमत २१ लाख रुपये आहे, तसेच गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (अंदाजे ५० हजार रुपये) असा एकूण २१,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.


या प्रकरणी समिक्षा अनिल गवई (वय १९), वैभव संजय गोपनारायण (वय २३), ऋतिक अजाबराव श्रृंगारे (वय २२) व समीर प्रदीप तेलखडे (वय १९) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक , अप्पर पोलीस अधीक्षक चंद्रकांत रेड्डी, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निशीन लेव्हस्कर यांच्या नेतृत्वात तपास पथकाने केली.
जुने शहर पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!