Join WhatsApp group

Ads

“बहुचर्चित अक्षय नागलकर मर्डर केसचा उलगडा! ९ आरोपींच्या अटकेनंतर समोर आले थरकाप उडवणारे पुरावे”

By Sarkarmzanews

November 2, 2025 11:17 am

Ads

अकोला – शहरातील बहुचर्चित अक्षय नागलकर खून प्रकरणाचा अखेर उलगडा झाला असून पोलिसांनी तब्बल ९ आरोपींना अटक करून मोठी कारवाई केली आहे. आरोपींकडून मृतकाचे हाडांचे तुकडे, दोन देशी पिस्तुल, तीन दुचाकी आणि एक चारचाकी वाहन तसेच सात मोबाईल फोन आणि जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

घटना कशी घडली?

दिनांक २२ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारास अक्षय विनायक नागलकर (वय २६, रा. अकोला) हा घरातून “१५ मिनिटांत येतो” असे सांगून बाहेर गेला, पण तो परतलाच नाही. त्यानंतर २३ ऑक्टोबर रोजी डाबकी रोड पोलिस ठाण्यात मिसिंगची नोंद (क. ४४/२०२५) करण्यात आली.
नातेवाईकांनी घातपाताचा संशय व्यक्त केल्यानंतर, पोलीस अधीक्षक अर्जित चांडक यांनी विशेष पथके स्थापन करून तपास सुरू केला.

खुनाची रचना

तपासादरम्यान समोर आले की, आरोपी चंद्रकांत उर्फ चंदु बोरकर याने काही साथीदारांच्या मदतीने गायगाव रोडवरील एम.एच.३० हॉटेल येथे अक्षय नागलकर याला बोलावून नेले. हॉटेलचे शटर बंद करून, गावठी पिस्तूल आणि धारदार शस्त्राने त्याचा खून करून, मृतदेहाची विल्हेवाट लावली.

पोलिसांचा जलद तपास

गुप्त माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ४८ तासांत संशयितांना अटक करण्यात आली.
अटक आरोपी —
१) चंद्रकांत महादेव बोरकर (४१, शिवसेना वसाहत, अकोला)
२) आशिष उर्फ आशु शिवकुमार वानखडे (३८, जुने शहर, अकोला)
३) श्रीकृष्ण वासुदेव भाकरे (३६, गोठी उमरी)
४) अशोक उर्फ ब्रम्हा पांडुरंग भाकरे (४४, मोरगाव भाकरे)
५) रोहित गजानन पराते (२८, गायत्रीनगर)
६) अमोल अजाबराव उन्हाळे (४४, हरीहर पेठ)
७) आकाश बाबुराव शिंदे (२५, भौर)
८) नारायण गणेश मेसरे (२८, लोटनापूर)
९) शिवहरी उर्फ शिया रविंद्र गाळी (२५, बाकराबाद)

हत्या आणि पुरावे नष्ट करण्याचा कट

चंदु बोरकर आणि अक्षय नागलकर यांच्यात पूर्वी झालेल्या वादातून वैर निर्माण झाले होते. या वैरातून चंदु बोरकरने काही महिन्यांपासून खुनाचा कट रचला होता.
खून केल्यानंतर आरोपींनी प्रेत मोरगाव भाकरे शेतात नेऊन जाळले आणि राख नदीत टाकून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.

पुढील कारवाई

या प्रकरणात आर्म्स अॅक्ट कलम ३, ४, २५ समाविष्ट करण्यात आले आहे. सर्व नऊ आरोपींना १ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर केले असता, ५ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर करण्यात आली आहे.

तपास पथक

तपासाचे मार्गदर्शन — मा. पोलीस अधीक्षक श्री. अर्चीत चांडक, अपर पोलीस अधीक्षक श्री. बी. चंद्रकांत रेड्डी यांचे मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधीकारी श्री. सुदर्शन पाटील करित असुन तपासमध्ये स्था.गु.शा. प्रमुख श्री. पो.नि. शंकर शेळके, प्रभारी अधिकारी पो.स्टे. डाबकीरोड स.पो.नि. अभिषेक अंधारे, स.पो.नि. गोपाल ढोले, स.पो.नि. विजय चव्हाण, पो.उप.नि. गोपाल जाधव, पो.उप.नि. विष्णु बोडखे, पो.उप.नि. माजीद पठाण, पो.उप.नि. अनिल चव्हान, प्रो. पो.उप.नि. योगेश चव्हान यांचे तथा स्था.गु.शा. येथील चार पथके आणि पो. स्टे. डाबकीरोड येथील गुन्हे शोध पथक यांचे सहकार्य प्राप्त झाले.

पोलिसांच्या तात्काळ आणि सुगम तपासामुळे या भीषण खून प्रकरणाचा पूर्ण उलगडा झाला असून आरोपींना कठोर शिक्षा होण्याची शक्यता आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!