Join WhatsApp group

Ads

“सरकार माझा न्यूज”चा दणका : शिवणचा भोंदूबाबाचा ‘दरबार’ अखेर बंद

By Sarkar Maza

April 14, 2026 10:31 am

Ads

मुर्तिजापूर – “सरकार माझा”च्या धडाकेबाज बातमीनंतर शिवण परिसरातील भोंदू बाबांच्या कारभारावर अखेर पडदा पडल्याचे समोर आले आहे. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या शिवण येथे तथाकथित ‘दरबार’ आणि अंधश्रद्धेच्या माध्यमातून लोकांची दिशाभूल करणाऱ्या या बाबाला ग्रामीण पोलिसांनी नोटीस बजावल्याने त्याने स्वतःच आपली दुकानदारी बंद करण्याची घोषणा केली आहे.

बाबाने सरकार माझा न्यूजला बोलताना धक्कादायक प्रतिक्रिया दिली. “माझ्या अंगात नेमकं काय येतं, हे मलाच कळत नाही,” असे सांगत त्याने आपल्याच दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तसेच, “आता मी दरबार चालवणार नाही, लोकांना धागे-दोरे देणार नाही. माझ्याकडे कोणीही येऊ नये,” असे आवाहनही त्याने आपल्या अनुयायांना केले.

या घटनेमुळे परिसरात मोठी चर्चा रंगली असून, अंधश्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेल्या फसवणुकीवर प्रशासनाने वेळेत कारवाई केल्याचे समाधान व्यक्त होत आहे. मात्र, अशा प्रकारच्या बाबांच्या जाळ्यात अडकणाऱ्या लोकांची संख्या मोठी असल्याने समाजानेही सजग राहणे तितकेच आवश्यक असल्याचे जाणकारांचे मत आहे.

अंधश्रद्धेचा पर्दाफाश, पण प्रश्न कायम

या प्रकरणामुळे एक मोठा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे—अशा भोंदूगिरीला खतपाणी मिळते ते नेमके कुणामुळे? भीती, अज्ञान आणि अंधविश्वास यांचा गैरफायदा घेत अनेक जण अशा प्रकारे लोकांना फसवत असल्याचे वारंवार समोर येत आहे.

लोकांनी जागरूक राहण्याचे आवाहन

तज्ञांच्या मते, “अंगात येणे”, “भूत काढणे”, “धागे-दोरे” अशा गोष्टींना कोणताही वैज्ञानिक आधार नसून या केवळ मानसिक किंवा सामाजिक कारणांमुळे घडणाऱ्या घटना आहेत. त्यामुळे नागरिकांनी अशा प्रकारांना बळी न पडता थेट वैद्यकीय किंवा अधिकृत मदत घ्यावी.

दरम्यान, “सरकार माझा”च्या या बातमीमुळे प्रशासन हालचालीत आले आणि एका भोंदूगिरीचा शेवट झाला असला, तरी अशा प्रकारांना पूर्णविराम देण्यासाठी समाजाची जागरूकता हीच खरी किल्ली असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!