Join WhatsApp group

Ads

-

अकोला बस स्थानकावरील ‘हिरकणी कक्ष’ केवळ देखावा; महिलांना अजूनही उघड्यावर स्तनपानाची वेळ

By Sarkarmzanews

January 5, 2026 5:12 pm

Ads

अकोला : दिनांक ०५ : महिला व बाल विकास विभाग, महाराष्ट्र शासनाच्या वतीने जिल्हा नियोजन समिती, अकोला यांच्या ३ टक्के निधीतून अकोला बस स्थानक परिसरात ‘हिरकणी कक्ष’ उभारण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्षात हा कक्ष केवळ नावापुरताच असून बहुतांश वेळा तो कायमस्वरूपी बंद (लॉक) अवस्थेत आढळून येत आहे.

बस स्थानकासारख्या गर्दीच्या ठिकाणी प्रवासासाठी येणाऱ्या महिलांना आपल्या लहान बाळांसह तासन्‌तास थांबावे लागते. अशा वेळी सुरक्षित, स्वच्छ व गोपनीय वातावरणात स्तनपान करता यावे, या उद्देशाने हिरकणी कक्षाची संकल्पना राबविण्यात आली होती.

मात्र कक्ष बंद असल्याने महिलांना आजही बस स्थानकाच्या परिसरात उघड्यावर स्तनपान करण्याची वेळ येत असून ही बाब महिलांच्या सन्मानास आणि सुरक्षिततेस बाधा पोहोचवणारी आहे.स्थानिक नागरिक व महिला प्रवासी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

शासनाने निधी खर्च करून सुविधा उभारली असताना तिचा वापरच होत नसेल, तर त्याचा नेमका उपयोग काय, असा सवाल उपस्थित होत आहे. संबंधित विभाग, महिला व बाल विकास अधिकारी तसेच एस.टी. महामंडळ प्रशासन यांनी याकडे तातडीने लक्ष देऊन हिरकणी कक्ष नियमितपणे सुरू ठेवावा.

स्वच्छता व देखरेखीची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे.महिला व बालकांसाठीच्या योजनांची अंमलबजावणी केवळ कागदावर न राहता प्रत्यक्षात प्रभावीपणे व्हावी, अन्यथा ‘हिरकणी कक्ष’सारख्या सुविधा केवळ देखावाच ठरणार, अशी भावना नागरिकांतून व्यक्त होत आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!