Join WhatsApp group

Ads

पिंजर पोलीस स्टेशनचे ठाणेदार गंगाधर दराडे हाजीर हो….!

By Sarkarmzanews

December 25, 2024 3:11 pm

Ads

बार्शीटाकळी: प्रतिनिधी, दिनांक २५: तालुक्यातील पिंजर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गंगाधर दराडे यांची एका प्रकरणात न्यायालयीन चौकशी पूर्ण होऊन त्यांना न्यायालयाने दिनांक 28 — 2025 रोजी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे, प्राप्त माहितीनुसार, पिंजर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेले मौजे पातुरनंदापूर येथील तक्रारदार गौतम जयराम तायडे ५५ वर्षे, यांचे विरुद्ध फौजदारी प्रकरण क्रमांक २२७/१४ हे प्रकरण दाखल असून तायडे हे सदर प्रकरणात गैरहजर राहिल्यामुळे त्यांचे विरुद्ध गैरजमानत वॉरंट पारित करण्यात आला होता.

सदर वॉरंट बजावण्याकरिता ठाणेदार गंगाधर दराडे यांना देण्यात आला होता, त्यामुळे ठाणेदार दराडे व पोलीस कर्मचारी पद्माकर पातोंड यांनी तायडे यांना वॉरंट बजावनाकरिता गेले असता, गौतम तायडे यांना वॉरंट बाबत कोणती माहिती न देता ,जोर जबरदस्तीने गाडीमध्ये बसविले, आणि आपल्या बुटाचा पाय तायडेयांच्या पायाच्या बोटावर ठेवून त्यांना जखमी केले, व त्यांना दोघांनीही अमानुषपणे मारहाण केली.

याबाबत फिर्यादी गौतम जयराम तायडे यांनी बार्शीटाकळी न्यायालयाकडे तक्रार दाखल केली, न्यायालयाने सदर प्रकरण चौकशीसाठी वरिष्ठ न्यायालयाकडे पाठविले असता, अकोल्याच्या न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करून कलम 223 BNSS प्रमाणे नोटीस काढण्याचे आदेश दिनांक 19- -12 -2024 रोजी दिले आहेत, त्यामुळे विद्यमान न्यायालयाने 28 -1 -25 रोजी ठाणेदार गंगाधर दराडे आणि पोलीस कर्मचारी पद्माकर पातोड यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

सदर फिर्यादीने आपल्या तक्रारीमध्ये ठाणेदार आणि पोलिसा कर्मचारी पद्माकर पातोंड यांनी गैर वर्तुनुक आणि मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे, त्यामुळे या प्रकरणाची विद्यमान न्यायालयाने चौकशी पूर्ण करून पिंजरचें ठाणेदार दराडे व पद्माकर पातोंड यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहे.

याबाबत ठाणेदार दराडे यांची प्रतिक्रिया घेतली असता, ते म्हणाले की, विद्यमान न्यायालय आम्हाला वॉरंट तामिल करण्याचे आदेश देत असते, विद्यमान न्यायालयांचे आदेशाचे पालन करून आम्ही आरोपींना वॉरंट बजावण्याचे काम करीत असतो, मी न्यायालयाचा आदर करतो, असे ते म्हणाले, परिणामी या गंभीर प्रकरणाकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

कायद्याचे संरक्षण करणे ही पोलिसांची जबाबदारी आहे, महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य ” सद्रक्षणाय खलनिग्रहनाय “याचा आदर राखणे आवश्यक आहे, त्यामुळे पोलिसांनी गुन्हा केला तर, त्यांचे बाबत उदार भूमिका न ठेवता, न्यायालयाने त्यांना अधिक कठोर शिक्षा देणे गरजेचे आहे, कायदा हा सर्वांसाठी लागू आहे, त्यामुळे अंतिम निर्णय हा न्यायालयाचा असेल.

एडवोकेट:डी, एस, पांडे

दिवाणी व फौजदारी न्यायालय बार्शीटाकळी

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!