Join WhatsApp group

Ads

स्मार्ट तपास, शांत शेवट; पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद, तरुणी सुरक्षित परत

By Sarkar Maza

March 17, 2026 8:38 am

Ads

मुर्तीजापुर : दिनांक १७ :

माना पोलिसांनी राबवलेल्या ‘ऑपरेशन शोध’ मोहिमेची सध्या जोरदार चर्चा सुरू असून अक्षरशः महिनाभर चाललेल्या या सर्च ऑपरेशननंतर बेपत्ता तरुणीचा अखेर ठावठिकाणा लागला. मोबाईल बंद, कोणताही डिजिटल ट्रेस नाही… तरीही पोलिसांनी शोधाची साखळी एक क्षणही तुटू दिली नाही.


१३ फेब्रुवारीला तक्रार दाखल होताच ठाणेदार गणेश नावकार यांनी या प्रकरणाला “टॉप प्रायोरिटी” देत तपासाची सूत्रं स्वतःकडे घेतली. ‘शोध’ मोहिमेत पोलिसांनी केवळ तांत्रिक साधनांवर अवलंबून न राहता मॅन्युअल इंटेलिजन्स, स्थानिक खबर्‍यांचे जाळे, प्रवास मार्गांचा अभ्यास, संभाव्य ठिकाणांची पडताळणी अशा प्रत्येक अँगलने तपास राबवला.


सातारा, नागपूर, भंडारा या ठिकाणी टीमने अक्षरशः पायपीट करत, हॉटेल्स, लॉज, बसस्टँड, रेल्वे स्टेशन अशा ठिकाणी चौकशी करत शोधमोहीम जिवंत ठेवली. मोबाईल बंद करून लपण्याचा प्रयत्न झाला असला तरी पोलिसांनी पॅटर्न ट्रॅकिंग आणि मानवी माहितीच्या आधारे साखळी जोडत शेवटी भंडाऱ्यात ठिकाण गाठलं.


अखेर तरुणी एका आंतरजातीय तरुणासोबत राहत असल्याचं स्पष्ट झालं आणि ‘ऑपरेशन शोध’चा क्लायमॅक्स झाला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोघांना ताब्यात घेतलं.


पण इथेच खास गोष्ट घडली — धडक कारवाईऐवजी माना पोलिसांनी संयम आणि समुपदेशनाचा मार्ग निवडला. शांततेत चर्चा करून तरुणीला आई-वडिलांच्या स्वाधीन करण्यात आलं, तर युवकालाही योग्य समज देण्यात आली. कोणताही वाद, तणाव किंवा कायदेशीर गुंतागुंत न वाढवता प्रकरण क्लीन फिनिश करण्यात आलं.

या संपूर्ण ‘ऑपरेशन शोध’मध्ये पोलिसांनी दाखवलेली चिकाटी, सातत्य आणि स्मार्ट प्लॅनिंग सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

“मोबाईल ऑफ असला तरी माना पोलिसांचा शोध ऑनच असतो!” अशी प्रतिक्रिया परिसरातून उमटतेय.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक बी. चंद्रकांत रेड्डी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!