Join WhatsApp group

Ads

एम.एल.सी.तथा महामंडळाच्या नियुक्त्या करण्याची मागणी नववर्षांच्या शुभ मुहुर्तावर करण्यात याव्या भाजपच्या जेष्ठ कार्यकर्त्यांची मागणी

By Sarkarmzanews

December 31, 2024 7:17 pm

Ads

बार्शीटाकळी, श्याम ठक : दि.३१ : बार्शीटाकळी शहरातील भाजपाच्या अनुसूचितजाती जमाती सेलचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले लक्ष्मण तुकाराम भिंगारदिवे उर्फ ल.तु.भिंगारदिवे यांनी एका पत्राद्वारे पक्षातील वरिष्ठांकडे मागणी केली आहे.. ते आपल्या पत्रात लिहतात की देशात व राज्यात ज्यांनी जीवाची पर्वा न करता ,घरावर तुळशीपत्र ठेवून,न भुतो न भविष्यती यश मिळवून दिले .

ते लिहतात कि गत दहावर्षात केलेल्या कार्याचा लेखाजोखा घरोघरी जाऊन सांगितला त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला , मतदारांनी भाजपा व मित्र पक्षांच्या उमेदवारांना प्रचंड मताने निवडून दिले.यापूर्वी एवढे प्रचंड यश मिळाले नव्हते. मग ह्या सर्व यशाला खेचून आणणाऱ्या कार्यकर्त्याच्या पदरी काय ?असा प्रश्न कार्यकर्त्यांना पडला आहे. यापूर्वी महायुतीचे सरकार असतांना,तत्कालीन मुख्यमंत्री महोदयांनी दिवाळी नंतर तर कधी अधिवेशनात असे झुलवत ठेवले आणि वेळ मारुन नेली.

आताही पुन्हा तेच चित्र समोर उभे राहते कि काय असा प्रश्न उपस्थित होतो आहे.निष्ठावंताना सत्तेच्या प्रवाहात सामावुन घेतले पाहिजे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमीच म्हणतात की ज्यांना कुणी विचारत नाही त्यांना मी विचारतो म्हणून यावरून असे वाटते की विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन वर्षाच्या शुभ मुहूर्तावर मला व माझ्या सारख्या निष्ठावंत पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना एम. एल. सी. किंवा महामंडळावर नियूक्ती देतील अशी आशा वाटते.. हा आशावाद कितपत खरा ठरतो हे काळ ठरवेलच आणि आमच्या मनातील इच्छा फलद्रूप झाल्या तर खऱ्या अर्थाने वाटेल की पक्षाने उशीराने का होइना आमच्या कार्याची दखल घेतली असे म्हटले तर वावगे ठरु नये …

Related Article

जनावरचोरांचा धुमाकूळ! पशुपालकांचा सवाल – पोलिसांना चोर सापडत नाहीत की शोधले जात नाहीत?

मुर्तीजापूर तालुक्यासाठी आमदार यांचे दिलासादायक निर्णय; आधुनिक आरोग्य सेवांचे स्वप्न साकार होण्याच्या मार्गावर

मुर्तीजापूरात धान्य घोटाळ्याचा भूकंप ? तपास यंत्रणांच्या हालचालींनी वाढली उत्सुकता : रेशन व्यवस्थेतील काळे धंदे उघड होणार?

“ठाणेदार गेले बदलीवर… पण मुर्तिजापूरकरांच्या मनातून जाणार नाहीत अजित जाधव!”

बोरगाव मंजूचे ‘रतन खत्री’ कोण ? स्मारक परिसरातील अवैध धंद्यांमुळे चर्चांना उधाण

माना पोलिसांची गावठी हातभट्टी अड्ड्यावर धाड; ६८ हजारांचा मुद्देमाल जप्त, एक आरोपी ताब्यात

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!