Join WhatsApp group

Ads

सरकार माझा न्युज IMPACT पोलिसांचाअ‍ॅक्शन: ५ गोवंश वाचले पण मुकिर-खलिकचे जाळे किती खोल?

By Sarkar Maza

April 3, 2026 12:19 am

Ads

मुर्तिजापूर प्रतिनिधी : मुर्तिजापूर शहरात तब्बल २० ते २५ ठिकाणी अवैध कत्तलखाने सुरू असल्याच्या आरोपांवर “सरकार माझा न्यूज”ने पोलखोल केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत पाच गोवंशाला जीवनदान दिल्याची माहिती समोर आली आहे.

२ एप्रिल रोजी रात्री सुमारे १० वाजताच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई करत पाच गोवंशांना ताब्यात घेतले, अशी माहिती पुढे आली आहे. विशेष म्हणजे, आज मुर्तिजापूर शहर पोलिसांनी कारवाईदरम्यान या पाच गोवंशांना चारा-पाणी देत जेवणाची व्यवस्था केली तसेच त्यांना पुंडलिक बाबा गौरक्षण येथे सुरक्षितपणे पाठवण्यात आले, ज्याबद्दल पोलिसांच्या संवेदनशीलतेचे नागरिकांकडून कौतुक होत आहे.

दर्यापूर येथून गोवंश तस्करी, वाहनांवर ‘एन्ट्री चार्ज’ आणि प्रत्येक गुरुवारी ठराविक पोलीस अधिकाऱ्यांना पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर आरोप समोर येत आहे. शुक्रवारी सकाळी काही भागांमध्ये निर्दय कत्तल सुरू होत असल्याची माहितीही पुढे येत आहे.

या रॅकेटमागे ‘मुकिर’ आणि ‘खलिक’ हे मास्टरमाईंड असल्याचा आरोप होत असून, त्यांनी काही अधिकाऱ्यांना लक्ष्मी दर्शन घडवून संमोहित केल्याची चर्चा आहे. तसेच, स्विगी-झोमॅटो प्रमाणे मांसाची होम डिलिव्हरी सुरू असल्याचेही समोर येत आहे.

दरम्यान, काही कथित सामाजिक संघटनांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा जनतेमध्ये असून, प्रशासनाच्या निष्क्रियतेवर नागरिक संताप व्यक्त करत आहेत. कारवाईत पाच गोवंश वाचवण्यात आले, ही सकारात्मक बाब असली तरी, हा अवैध व्यवसाय कायमचा बंद होणार का? याची हमी पोलीस प्रशासन घेणार का? हा मोठा प्रश्न उभा राहिला आहे.

याच पार्श्वभूमीवर, ठाणेदार अजित जाधव हे संमोहित झालेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करणार का? असा थेट सवाल उपस्थित होत आहे. तसेच, जागरूक जनता आणि पत्रकार मंडळींनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांची पोलखोल करावी का? अशी मागणीही जोर धरत आहे.

आज जनता जागरूक झाली आहे—पण आता पोलीस प्रशासनही तितक्याच तत्परतेने जागरूक होणार का? की फक्त बातमी आल्यानंतरच कारवाई पाहायला मिळते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!