Join WhatsApp group

Ads

सम्राट सुरवाडे रचणार इतिहास

By Sarkarmzanews

October 22, 2024 5:42 pm

Ads

मूर्तिजापूर – २२ ऑक्ट.२४ – मूर्तिजापूर विधानसभा क्षेत्रात सम्राट सुरवाडे यांनी AIMIM पक्षाकडून आपली दावेदारी मूर्तिजापूर बार्शीटाकळी मतदारसंघात घोषित केली आहे.

या अगोदर मुर्तीजापुर बार्शीटाकळी विधानसभा 32 मधून कोणीच ए आय एम आय एम या पक्षाकडून उमेदवारी लढली नसून पहिल्यांदा या क्षेत्रातून या उमेदवारी लढून इतिहास रचत आहे

मुर्तीजापुर बार्शीटाकळी क्षेत्रात आचारसंहिता सुरू होण्याच्या अगोदरच सम्राट सुरवाडे यांनी ग्रामीण विभागात जाऊन जनतेचे कौल घेऊन, दिग्गजांच्या नेत्यांचा धनाढ्य उमेदवाराचां विरोधात रणशिंग फुंकले. सम्राट सुरवाडे यांचे विचार धर्मनिरपेक्ष आहे, तसेच अकोला शहरात रुग्णसेवक म्हणून यांची ख्याती आहे. या साठी गोरगरीब लोकांनी सम्राट सुरवाडे यांना साथ देण्याची कबूली दिली आहे.

कोण आहेत सम्राट सुरवाडे?

सम्राट सुरवाडे गरीब परिवारातून आलेला सामान्य माणूस लहानपणापासून यांना समाजकार्याची आवड असल्यामुळे यांनी अनेक समाजकार्य केले तसेच वेगवेगळे आंदोलन करून सामान्य जनतेला त्यांच्या हक्काचा न्याय मिळवून दिला.

भीम योद्धा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष असून अनेक धार्मिक शैक्षणिक सामाजिक रुग्णसेवा असे वेगवेगळे कार्यक्रम यांनी आपल्या संस्थेच्या मार्फत राबवले. संस्थेचे कार्य करताना त्यांना लक्षात आले की जर आपण राजकारणात गेलो आणि लोकप्रतिनिधी म्हणून आपली ओळख निर्माण केली.

जिथे आज आपण शेकडो सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत जे प्रयत्न आज छोट्या स्तरावर यशस्वी होत आहे जर आपण लोकप्रतिनिधी म्हणून जनतेचा काम केला तर गोरगरिबांची आवाज शोषित वंचितांची आवाज ही विधानसभेत मांडू शकतो.

या कारणाने त्यांनी राजकारणात धडक एन्ट्री घेऊन सामान्य जनतेचा नेता म्हणून आपली ओळख निर्माण करून विधानसभेच्या निवडणुकीसाठी छातीला माती लावली आहे आता जनता यांना किती साथ देते हे बघणे आता त्यांच्या स्वता साठी व जनतेसाठी गरजेचे झाले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!