Join WhatsApp group

Ads

-

निर्दय कत्तलीचा डाव हाणून पाडला : ऑपरेशन प्रहार अंतर्गत ५ बैलांची सुटका

By Sarkarmzanews

January 18, 2026 9:01 pm

Ads

माना (ता. मुर्तिजापूर) : दिनांक १८ : अवैध कत्तल आणि गोवंशीय प्राण्यांवरील क्रूरतेविरोधात माना पोलिसांनी ऑपरेशन प्रहार अंतर्गत जोरदार धडक देत मोठी कारवाई केली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पहाटेच्या अंधारात टाकण्यात आलेल्या छाप्यात कत्तलीच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेले ५ गोवंशीय बैल पोलिसांनी सुखरूप ताब्यात घेतले. या प्रकरणी अनोळखी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

दि. १८ जानेवारी २०२६ रोजी पहाटे ०४.१० ते ०४.५० वाजताच्या सुमारास ग्राम माना येथील इदगाहच्या मागील बाजूस ही थरारक कारवाई पार पडली. पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत घटनास्थळी पाहणी केली असता, गोवंशीय बैलांना आखूड दोराने घट्ट बांधून, हालचालही करता येणार नाही अशा अवस्थेत ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

कडाक्याच्या थंडीमध्ये वेदना सहन करत असलेले हे मुकबधिर प्राणी कत्तलीसाठीच ठेवण्यात आले असल्याचे स्पष्ट झाले.

या घटनेप्रकरणी अप. क्र. २०/२०२६ अन्वयेमहाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ चे कलम ५, ९, ११ तसेचप्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम १९६० चे कलम ११(१)(अ)(फ)(ह)(आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या ५ गोवंशीय बैलांची अंदाजे किंमत १,१६,००० रुपये इतकी असून त्यांची सुरक्षित ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे.

माना पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध कत्तल करणाऱ्या टोळ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ऑपरेशन प्रहार अंतर्गत पुढील काळात अशा कारवाया अधिक तीव्र केल्या जातील, असा इशारा ठाणेदार गणेश नावकार यांनी दिला आहे.

ही संपूर्ण कारवाई मा. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, मा. अप्पर पोलीस अधीक्षक बदेली चंद्रकांत रेड्डी, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी सौ. वैशाली मुळे यांच्या मार्गदर्शनाखालीठाणेदार गणेश नावकार, पो.हे.कॉ. मनोहर इंगळे, मंगेश इंगोले, पो.कॉ. सुशील आठवले, प्रमोद हिवराळे, मंगेश पवार, ललित बनचरे यांच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!