Join WhatsApp group

Ads

रवी राठी यांचा उमेदवारी साठी राजकीय क्षेत्रात हालचालींना वेग

By Sarkarmzanews

October 25, 2024 9:32 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २५ ऑक्टो. २४ – मुर्तीजापुर बर्शिटाकली विधानसभेत सध्या सगळे उमेदवार जाहीर झाले असून भा.ज .प. पक्षाची उमेदवारी अद्याप हि जाहीर झाली नसताना , आज रवी राठी यांनी भा.ज .प. मध्ये प्रवेश घेऊन एक नवीन राजकीय अध्यायाला मुर्तीजापुर विधानसभा क्षेत्रात सुरुवात केली आहे, थेट आज सकाळी भा.ज .प. कार्यालय गाठले व पक्ष श्रेष्टी सोबत मुलाखाती घेऊन जाहीर प्रवेश केला.

आज सकाळ पासून त्यांचा बैठकांचा दौर धडक्याने सुरु असून अध्याप हि त्यांच्या बैठका सुरु आहे. रवी राठीने शेवटचा चेंडूत शटकार मारल्याचा दिसून येत आहे आज संध्याकाळी कार्यकर्त्यांनी आतिषबाजी करून लोकांना संम्भ्रणात टाकले असून पेढ्यांचे वाटप सुरु केले आहे, पण कोणी १००% उमेदवारी जाहीर झाली याची खात्री करत नसून लोकांना भ्रमित तर करत नाही ना असे प्रश्न उपस्थित होत आहे.

विश्वसनीय सूत्रांचा माहिती प्रमाणे नागपूर येथे फोन करून अकोल्यात्यील काही नेते मंडळीने छुप्या पद्दतीने रवी राठी यांचा पत्ता फिक्स केल्याचे समजते. अजून पण जिल्ह्यातील भा.ज .प. पक्षाचे नेते मंडळी रवी राठी यांचा साठी पक्ष श्रेष्ठी जवळ टाईट फिल्डिंग लावून बसल्याचे सूत्रान कडून समजते.

आता उद्या दुपार पर्यंत रवी राठी यांचे उमेदवारी निश्चित होण्याचे समजते. पण सध्या उमेदवारी ९९.९९% पक्की झाली आहे असे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!