Join WhatsApp group

Ads

राजेश मिश्रा निवडणुक लढण्याचा पूर्ण तयारीत

By Sarkarmzanews

October 28, 2024 12:57 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २८ ऑक्ट. २४ – आज राजेश मिश्रा यांनी अकोला पश्चिम विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढ्याची पूर्ण तयारीत दाखविली आहे, मागील ३० वर्षापासुन शिवसेना पक्षात बाळासाहेब ठाकरे याचा आदर्श घेऊन समाजसेवेत रात्रंदिवस अविरत रमले आहे.

वेळोवेळी गरीब जनतेचा आवाज उचलण्यासाठी यांनी अनेक आंदोलन केले तसेच अनेक गुन्हे समाजा च्या हितासाठी स्वतःवर दाखल करून घेतले मात्र अनेक वेळेस यांना कुठल्या ना कुठल्या कारणाने विधानसभेसाठी डावलण्यात आले पण सध्या अकोला पश्चिम मधली जनताने अशा लढवय्या नेत्याला आपला भावी आमदार म्हणून मनात जागा दिली आहे.

विधानसभा निवडणूक लढण्यासाठी अनेक दिग्गजांनी राजेश मिश्रा यांना फोन करून पाठिंबा जाहीर केला आहे, तसेच गोरगरीब जनतेने यांना निवडणूक पूर्वीच आपला आमदार घोषित केला.

सध्या राजकीय वर्तुळात काही विरोधकांकडून अफवा उडत आहे की राजेश मिश्रा या वेळेस फॉर्म भरून परत घेणार पण राजेश मिश्रा विधानसभा 2024 निवडणुकीत निवडणूक लढण्याचे त्यांनी पूर्णपणे मन बनविले आहे.

या वेळेस ही माझी लढाई नसून जनतेची लढाई आहे, सध्या राजकीय पारा उंच असून माझ्या लाडक्या जनतेने भूलथापांना बळी न पडता यावेळेस अकोला पश्चिम मतदारसंघात प्रत्येक मतदार राजांनी स्वतःला राजेश मिश्रा समजून मला उमेदवार न समजता स्वतः ला उमेदवार समजावे व निवडणुक अर्ज दाखल केल्यानंतर जनतेची सरकार बनवण्यासाठी काम सुरू करावे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!