Join WhatsApp group

Ads

वाटणीच्या वादाने घेतला हिंसक वळण ; कौटुंबिक वादाचे रुपांतर रक्तरंजित हल्ल्यात; पोलीस तपास सुरू

By Sarkar Maza

February 28, 2026 4:03 pm

Ads

मुर्तिजापूर ग्रामीण (दि. 28 फेब्रुवारी 2026):

घराच्या हिस्सेवाटणीच्या वादातून ग्राम हीरपूर येथे चाकूने हल्ला करून पती-मुलीला जखमी केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पो. स्टे. मुर्तिजापूर ग्रामीण येथे अप क्र. 131/26 अन्वये भा. न्या. संहिता 2023 मधील कलम 118 (1), 115, 351 (2), 352, 3 (5) प्रमाणे गुन्हा कायम करण्यात आला आहे.

तपास अधिकारी म्हणून एएसआय संजय खंडारे काम पाहत असून, दाखल अधिकारी पो.हे.कॉ. दिलीप आठवले आहेत.

याबाबत फिर्यादी सौ. रेखा मंगेशराव जोगी (वय 40, व्यवसाय शेतमजुरी, रा. हीरपूर ता. मुर्तिजापूर जि. अकोला) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 27 फेब्रुवारी 2026 रोजी रात्री सुमारे 10.30 वाजता त्या आपल्या कुटुंबीयांसह घरी बसल्या असताना आरोपी श्रीकृष्ण गादे, सुनीता गादे व राम श्रीकृष्ण गादे (रा. मजलापूर धामोरी जि. अमरावती, ह.मु. हीरपूर) हे त्यांच्या घरी आले.

घराच्या हिस्सेवाटणीवरून दोन्ही कुटुंबांत वाद झाला.फिर्यादीच्या पतीने आरोपींना समज देण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी शिवीगाळ करत भांडण सुरू केले. झटापटीदरम्यान आरोपी क्रमांक 1 यांनी फिर्यादीच्या पतीच्या हाताच्या अंगठ्याला चावा घेतला. आरोपी क्रमांक 2 हिने त्यांचे हात धरले.

त्यानंतर आरोपी क्रमांक 3 यांनी घरातून चाकू आणून फिर्यादीच्या पतीच्या दोन्ही हातांवर वार करून त्यांना जखमी केले.मध्यस्थी करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या मुलगी कु. आराध्या हिलाही आरोपी क्रमांक 3 यांनी डाव्या हाताच्या पंजावर चाकूने मारून जखमी केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

फिर्यादी व त्यांच्या सासू शशीकलाबाई जोगी यांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता त्यांनाही चाकूने मारण्याची धमकी देण्यात आली.

जखमींना तातडीने वैद्यकीय उपचारासाठी हलविण्यात आले असून, वैद्यकीय प्रमाणपत्राच्या आधारे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास मुर्तिजापूर ग्रामीण पोलीस करीत आहेत.

फोटो : Ai genrated

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!