Join WhatsApp group

Ads

-

सत्ता आली, पदे वाटली… पण मुर्तिजापूर अजूनही तहानलेलाच! पाणी प्रश्नावर तोडगा कधी?

By Sarkarmzanews

January 16, 2026 7:47 am

Ads

मुर्तिजापूर: दिनांक १६ : निवडणूक झाली, राजकारण तापलं, निकाल लागले.जिंकणारे मिरवले, हरणारे गप्प बसले. पदग्रहण सोहळे झाले, स्वीकृत नगरसेवक ठरले, त्यातलं राजकारणही थंड झालं.पण मुर्तिजापूरचा खरा प्रश्न मात्र तसाच उभा आहे — पाणी.

इतिहासा मध्ये कित्येक सत्ता नगराध्यक्ष व नगरसेवक जमा झाले वर्षानुवर्षे पाणीटंचाईचा सामना करणारी मुर्तिजापूरची जनता आजही तहानलेली आहे.

आठ–आठ दिवसांनी येणारे नळ, अपुरा दाब, अनियमित पुरवठा आणि नागरिकांचा रोजचा संघर्ष हे चित्र अजूनही बदललेले नाही.

शहराच्या विकासाच्या गप्पा होतात, पण पाण्याशिवाय विकास कसा शक्य आहे?नागरिकांचा साधा प्रश्न आहे —“आठ दिवसांनी येणारे नळ रोज येणार का?”

ही केवळ असुविधा नाही, तर नागरिकांच्या मूलभूत हक्काचा प्रश्न आहे. महिला, विद्यार्थी, कामगार, व्यापारी — सगळ्यांनाच याची झळ बसते.

पिण्याचा पाण्यासाठी आरो कॅन वर अवलंबून राहणे, पिण्याचा पाण्यासाठी सुद्धा पैसे मोजणे, हे सर्व आता नित्याचे झाले आहे.

नवीन नगरपरिषद, नवे नगराध्यक्ष आणि नवे लोकप्रतिनिधी सत्तेत आले आहेत. त्यामुळे अपेक्षा देखील वाढल्या आहेत. नगराध्यक्ष हर्षल साबळे यांनी या प्रश्नाकडे तातडीने लक्ष घालण्याची गरज आहे.

आरोप-प्रत्यारोप, राजकीय कुरघोड्या यापेक्षा पाणीपुरवठ्याचा ठोस आराखडा, वेळापत्रक आणि अंमलबजावणी हाच खरा कस आहे.

आज तहानलेली जनता कोणत्या पक्षाकडे नाही, तर पाण्याकडे पाहत आहे.आश्वासणांपेक्षा कृती हवी आहे.नियोजना पेक्षा नळातून दररोज पाणी हवे आहे.

आता प्रश्न फक्त एवढाच उरतो की मुर्तिजापूरची पाणी समस्या नेमकी कधी सुटणार?याचं उत्तर केवळ भाषणात नाही, तर जमिनीवर दिसायला हवं.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!