Join WhatsApp group

Ads

राजकीय हेतू कि अतिउत्साही कार्यकरत्याचे विक्रम ?

By Sarkarmzanews

November 11, 2024 3:03 pm

Ads

प्रेमराज शर्मा – मूर्तिजापूर तालुक्यातील कार्ली या गावात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ( श. प) च्या उमेदवाराकडून चक्क श्री छत्रपती शिवाजी महाराजांची अवेहेलना झाल्याचा संताप जनक प्रकरण समोर आले आहे. या मुळे मात्र गावात काहीकाळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघ अंतर्गत येत असलेल्या मुर्तीजापुर तालुक्यातील कार्ली या गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेवर चेहऱ्यावर राष्ट्रवादीपक्षाचे तुतारी चिन्ह असलेले स्टीकर चिपकविले असून अवमान झाल्याचा प्रकार घडला आहे. आता हे कृत्य कोणाचे ? या मध्ये काही राजकीय हेतू किंवा अति उत्साही कार्यकर्त्याने केलेला विक्रम तर नाही ना?

यामुळे काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले असतांना मुर्तीजापुर विधानसभे मध्ये झालेल्या या प्रकरणाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गटाचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी कि विरोधी पक्षाचा कार्यकर्त्यांनी कारली या गावात असलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकातील महाराजांच्या प्रतिमेवर पक्षाचे तुतारी चिन्हांचे स्टिकर लावल्याने छत्रपती शिवाजी महाराज प्रेमींकडून मोठया संताप जनक प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. या प्रकरणा वरून पक्षाचा एक युवक पदाधीकारीने सुद्धा रोष व्यक्त केले आहे.

आता पर्यंत या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श. प) गट व त्यांचे उमेदवार सम्राट डोंगरदिवे यांच्या कळून कुठलेहि स्पष्टीकरण देण्यात आले नसून भविष्यात निवडणुकीवर याचा काय परिणाम होईल याची चर्चा सध्या मतदारसंघात रंगली आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!