Join WhatsApp group

Ads

-

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा छापा – सात आरोपी अटकेत

By Sarkarmzanews

July 2, 2025 2:53 pm

Ads

अकोला – २ जुलै २५ : अकोट फैल पोलिस ठाण्याच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यांवर पोलिसांनी कारवाई करत सात जणांना अटक केली.

यावेळी पोलिसांनी १ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार सध्या ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाई सुरू आहे. त्या अंतर्गत अकोट फैल पोलिस ठाण्याचे निरीक्षक शेख रहीम यांना नायगाव व रामदास मठ परिसरात काही व्यक्ती जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. माहितीच्या आधारे डीबी पथकाने छापा टाकून सात आरोपींना अटक केली.

या कारवाईत पोलिसांनी १ लाख ३० हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी आणि ६ हजार २०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण १ लाख ३६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शेख रहीम यांच्या मार्गदर्शनाखाली अनिस पठाण, योगेश काटकर, संतोष चिंचोलकर, हर्षल श्रीवास, इम्रान शहर, गिरीश तिडके आणि आमीर यांनी केली.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!