Join WhatsApp group

Ads

“शिवरायांच्या जयंतीला लोकप्रतिनिधींची पाठ फिरवली! जीतापूर खेडकरमध्ये ग्रामस्थांचा संताप”

By Sarkar Maza

February 20, 2026 4:13 pm

Ads

मूर्तिजापूर, दिनांक २० : संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त उत्साह, अभिमान आणि जल्लोषाचे वातावरण असताना मूर्तिजापूर तालुक्यातील जीतापूर खेडकर गावात मात्र उदासीनतेचे चित्र पाहायला मिळाले.

गावातील शिवजयंती कार्यक्रमाला ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच आणि सदस्य अनुपस्थित राहिल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ग्रामपंचायत मध्ये शिवजयंतीनिमित्त महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन व कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र ग्रामपंचायतीतील जबाबदार पदाधिकारीच गैरहजर राहिल्याने कार्यक्रमावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

“विकासाच्या नावावर सभा घेणारे लोकप्रतिनिधी शिवरायांच्या जयंतीला का दिसले नाहीत?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

महाराष्ट्राच्या अस्मितेचा दिवस

छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती हा महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा आणि इतिहासाच्या गौरवाचा दिवस मानला जातो. स्वराज्य स्थापनेचा ध्यास, स्त्रीसन्मानाचे रक्षण आणि शोषितांच्या न्यायासाठी दिलेला लढा यामुळे शिवरायांचे स्थान अढळ आहे. राज्यभर शासकीय ते सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात कार्यक्रम साजरे केले जात असताना जीतापूर खेडकरमध्ये मात्र अधिकृत प्रतिनिधींची अनुपस्थिती खटकणारी ठरली.

जबाबदारी की केवळ राजकारण?

निवडणुकांच्या वेळी शिवरायांचे नाव घेऊन मते मागायची, पण त्यांच्या जयंतीसारख्या महत्त्वाच्या दिवशी गैरहजर राहायचे, ही दुहेरी भूमिका असल्याची टीका ग्रामस्थांकडून होत आहे. लोकप्रतिनिधींनी या गैरहजेरीबाबत खुलासा करावा, अन्यथा पुढील ग्रामसभेत जाब विचारला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

शिवरायांचा आदर्श केवळ घोषणांमध्ये नको, तर कृतीतही दिसला पाहिजे, अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

जीतापूर खेडकर येथील हा प्रकार सध्या तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.

Oplus_131072
No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!