Join WhatsApp group

Ads

डिजिटल अकोटकडे पंचायत समितीची वाटचाल,डिजिटल प्रशासनाची नवी सुरुवात

By Sarkar Maza

March 6, 2026 9:13 pm

Ads

अकोट : शासन सेवा अधिक पारदर्शक आणि नागरिकांपर्यंत जलद पोहोचविण्यासाठी अकोट पंचायत समितीने टेक्नॉलॉजीचा वापर करत अधिकृत वेबसाईट सुरू केली आहे. या वेबसाईटचे उद्घाटन शुक्रवार (६ मार्च) रोजी पंचायत समिती कार्यालयात करण्यात आले.

जिल्हा परिषद अकोला येथील मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अनिता मेश्राम (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या प्रतिनिधी म्हणून सहायक गट विकास अधिकारी (पंचायत विभाग) श्री. हरिनारायण परिहार यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी गटविकास अधिकारी श्री. राजेश खुमकर उपस्थित होते.या वेबसाईटच्या माध्यमातून पंचायत समिती अकोट अंतर्गत येणाऱ्या नागरिकांना शासन निर्णय, विविध शासकीय योजना, महत्त्वाची संकेतस्थळे, तक्रार नोंदणी व त्यावरील स्थिती, तसेच कार्यालयातील अधिकारी-कर्मचाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक यांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे.

तसेच पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, कार्यक्रम व योजनांमध्ये निवड झालेल्या लाभार्थ्यांची माहितीही नागरिकांना सहज पाहता येणार आहे. त्यामुळे नागरिकांचा वेळ व त्रास वाचणार असून शासन सेवा अधिक पारदर्शक आणि सुलभ होणार आहे.

या कार्यक्रमाला जिल्हा परिषद अकोला अंतर्गत येणाऱ्या सर्व पंचायत समित्यांमधील विस्तार अधिकारी तसेच पंचायत समिती अकोटमधील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

वेबसाईट निर्मितीसाठी तत्कालीन तालुका व्यवस्थापक श्री. कुलदीप चोरे यांचे विशेष सहकार्य लाभले.प्रशासनाच्या वतीने जास्तीत जास्त नागरिकांनी या वेबसाईटचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!