Join WhatsApp group

Ads

शिवजयंती निमित्त नगरसेवक राम जोशी यांचा महाराजांना मानाचा मुजरा; स्मारकासाठी हायड्रोलिक लिफ्टचा निर्णय

By Sarkar Maza

February 19, 2026 8:24 am

Ads

मुर्तीजापूर, दि. 19 फेब्रुवारी 2026 — शिवजयंतीच्या पावन पर्वावर नगरसेवक राम जोशी यांनी श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करत सामाजिक बांधिलकी जपणारा महत्त्वपूर्ण प्रस्ताव नगर परिषदेच्या पहिल्या सार्वजनिक बैठकीत मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक हे केवळ दगड-मातीचे बांधकाम नसून ते स्वराज्य, शौर्य, न्याय आणि सर्वसमावेशकतेचे प्रतीक आहे.

या स्मारकावर सर्वसामान्य नागरिकांना, विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग बांधव आणि लहान मुलांना सुलभतेने जाऊन पूजन करता यावे, यासाठी हायड्रोलिक लिफ्ट बसविण्याचा विषय सभागृहात मांडण्यात आला.

नगराध्यक्ष हर्षल रामेश्वर साबळे व मुख्याधिकारी निलेशजी जाधव यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत विशेष सूचित समाविष्ट केला. येत्या काळात स्मारक परिसरात हायड्रोलिक लिफ्ट उभारण्यात येणार असून स्मारकाचे सौंदर्यीकरणही करण्यात येणार आहे.

या निर्णयामुळे सामाजिक समतेचा संदेश अधिक बळकट होणार आहे. महाराजांच्या विचारांप्रमाणे सर्वांना समान सन्मान आणि संधी देण्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित होत आहे. शिवजयंती हा केवळ उत्सव नसून समाजघडणीचा संकल्प दिवस आहे, आणि त्या दिशेने टाकलेले हे पाऊल निश्चितच शहरासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

मुर्तीजापूर शहरातील नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत नगरसेवक राम जोशी यांचे कौतुक केले आहे. शिवजयंतीच्या निमित्ताने घेतलेला हा निर्णय शहराच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!