Join WhatsApp group

Ads

--

राजापेठ पोलिसांचा दोन नंबर चा धंद्यावाल्यांचा सोबत चहा पाणी वाढला.

By Sarkarmzanews

December 7, 2024 9:23 pm

Ads

न्यूज डेस्क : दिनांक ०७ : वाढत्या गुन्हेगारीने सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मात्र कुंपणच शेत खात आहे, अशी पोलिस दलाची अवस्था आहे. ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या ब्रीदला जागण्याबरोबरच पोलिस दलाची प्रतिमाही उंचवावी लागणार आहे. खाकीचा धाक, जरब निर्माण करावी लागणार आहे.

मागील महिन्यात बेछूट सशस्त्र हल्ले, खून, खुनाचा प्रयत्न पाहण्यास मिळाले, सध्या जुगार-मटक्याच्या अड्ड्यांचा सुळसुळाट, देशी दारूची अवैध वाहतूक, भूमाफियांचा उच्छाद अशा एक से बढकर एक घटनांनी सध्या राजापेठ भाग गांगरून गेल्याचे दिसत आहे. एकेकाळी भयमुक्त अमरावतीचा नारा देत राजकारण करणारे देखील या घटनांनी घरकोंबडे झालेत की काय, असा प्रश्न पडावा अशी स्थिती आहे.

पोलिसांचे काही चुकतंय का.. गुन्हेगार एकाएकी असे मोकाट का सुटलेत… या साऱ्या प्रश्नांचे एकच उत्तर देणे अशक्य असले तरी भाकरी फिरविली नाही हे त्यातील एक प्रमुख कारण लक्षात येऊ शकेल. सध्या राजापेठ पोलीस स्टेशन दोन नंबरचा धंद्या कडे जास्तच लक्ष देत असल्याचे निदर्शनास येत आहे. दिवस भर काही पोलीस कर्माचारी शहरात दोन नंबरचा धंद्यावाल्यांचा संपर्कात जास्त राहून त्या सोबत चहा पाणी करताना दिसतात. संध्याकाळचा तर विचारू नका.

या मुळे कदाचित पोलिसांचे लक्ष सध्या सामान्य जनते कळे कमी दिसत असल्याची चर्चा शहरात चांगलीच रंगलेली दिसते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!