Join WhatsApp group

Ads

नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांचा सत्कार

By Sarkarmzanews

August 14, 2025 5:47 pm

Ads

मुर्तिजापूर : दिनांक १४ ऑगस्ट २५ :

येथील नवनिर्वाचित उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती वैशाली मुळे यांचा उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार यांच्या हस्ते आज सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी विविध विभागांचे अधिकारी, पोलीस दलातील कर्मचारी तसेच मान्यवर उपस्थित होते.

छाया चित्र – प्रेमराज शर्मा

कार्यक्रमात श्रीमती मुळे यांनी पदभार स्विकारल्यानंतर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला.उपविभागीय अधिकारी संदीप अपार यांनी त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या व नागरिकांच्या सुरक्षेसाठी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार प्रदर्शन स्थानिक प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!