Join WhatsApp group

Ads

आणखी एक नवीन महिला उमेदवार पैराशूट घेऊन रिंगणात…

By Sarkarmzanews

October 20, 2024 7:06 pm

Ads

प्रेमराज शर्मा – २० ऑक्टो.२४ – मुर्तीजापुर – मुर्तीजापुर बार्शीटाकळी मतदार संघात आता पैराशूट उमेद्वारांची गर्दी खूप झाली असून पैराशूट उतरविण्यासाठी आता पक्ष मैदान गच्च भरला असून पैराशूट पार्किंग साठी जागा उरली नाही, जागा नसल्यामुळे आता पैराशूट उमेदवार आपला पैराशूट घेऊन सरळ मुंबईचा पक्ष कार्यालयात उतरवीत आहे.

आज अकोल्यावरून एक महिला पैराशूट उमेदवार पैराशूट घेऊन सरळ मुंबईला उतरली असून त्या एका विशिष्ट पक्षाच्या जिल्हा परिषद सदस्य आहे, तसेच मागील वेळेस त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पद सुद्धा भूषविले आहे. जिल्ह्यातील एक श्रेष्ठ पदाधिकारीने या पैराशूट उमेदवाराला पैराशूट घेऊन सरळ मुंबईला बोलविले.

विश्वसनीय सूत्रांचा आधारे माहिती होत आहे कि त्या पदाधीकारीला एक १००% कन्फर्म झालेले एक उमेदवाराचे तिकीट कापून आपल्या सहकारी मित्राला द्यायचे आहे पण सहकारी सुद्धा पैराशूट असल्यामुळे गेम तिथे फसत आहे. त्या पदाधीकारीचे हळू हळू एक एक पत्ते फेल होत असल्यामुळे तो नवीन नवीन डाव १००% कन्फर्म झालेलल्या एक उमेदवाराचे तिकीट कापण्यासाठी पक्ष श्रेष्टीवर टाकत आहे.

आता त्याने महिला सक्षमीकरणची चर्चा पक्ष श्रेष्टीच्या बाजूने उभे राहून एकली होती तर त्याने आता मतदार संघातील काही सक्षम महिलांना पक्षा समोर उभे केले आहे. आजचा दिवसात दोन महिला भावी उमेदवार मुंबईत जिल्ह्यातील त्या पदाधिकार्याने बोलविले.

पण आज जे महिला पैराशूट उमेदवार तिथे पोहोचली तिचा भेटीगाठी पक्ष श्रेष्टीसोबत करून दिल्या पण ती महिला पण खूप हुशार असून तिने भाऊला अट घातली आहे कि माझ तिकीट कन्फर्म झाल तरच मी पक्षात प्रवेश घेईल अन्यथा माझ पैराशूट घेऊन जिल्हा परिषदला परत जाईल.

स्वतः चे वांदे असून दुसर्याचा मेहनती वर पाणी फिरवण्याचा डाव कितीपट योग्य आहे आता अशी चर्चा कार्यकर्त्यान मध्ये सुरु आहे.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!