Join WhatsApp group

Ads

‘हिंद की चादर’ समागमासाठी नांदेड सज्ज; आमदार हरीश पिंपळे यांच्या कडून दोन बस रवाना

By Sarkarmzanews

January 24, 2026 1:51 pm

Ads

मूर्तिजापूर: दिनांक: २४ : शीख धर्माचे नववे गुरु, श्री गुरु तेग बहादूर जी यांच्या ३५० व्या महान शहीदी समागम वर्षानिमित्त नांदेड येथे ‘हिंद की चादर’ (Hind Di Chadar) हा भव्य राज्यस्तरीय कार्यक्रम २४ व २५ जानेवारी २०२६ रोजी वाघाळा परिसरातील मोदी मैदानावर आयोजित करण्यात आला आहे.

२४ जानेवारी रोजी सकाळी तख्त सचखंड श्री हजूर साहिब गुरुद्वारापासून कार्यक्रमस्थळापर्यंत भव्य नगर कीर्तन काढण्यात आले असून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली.

मैदानावर गुरुद्वाराची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली असून तेथे श्री गुरु ग्रंथ साहिब विराजमान आहेत.या ऐतिहासिक सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहणार आहेत.

देश-विदेशातून सुमारे १० लाख भाविक सहभागी होणार असून त्यांच्यासाठी विशाल लंगर, विशेष रेल्वे, तात्पुरते रुग्णालय व रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

प्रशासकीय नियोजनाअंतर्गत २४ जानेवारी रोजी नांदेड शहर व तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली असून २५ जानेवारी रोजी शहरातील आठवडी बाजार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

हा सोहळा शीख समुदायासह बंजारा, सिंधी, मोहयाल, वाल्मीकि व भगत नामदेव संप्रदायासह नऊ समुदायांच्या एकात्मतेचे प्रतीक मानला जात आहे.

दरम्यान, मुर्तिजापूर येथून या यात्रा कार्यक्रमासाठी अमृतवेला ट्रस्टचे सेवक तसेच सिंधी समाजाचे बांधव यांना सहभागी होण्यासाठी मुर्तिजापूरचे लोकप्रिय आमदार हरीश मारुती आप्पा पिंपळे यांच्या सहकार्यातून दोन लक्झरी बसेसची व्यवस्था करण्यात आली.

नवनिर्वाचित नगरसेवक भूपेंद्र पिंपळे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून बसेस नांदेडकडे रवाना करण्यात आल्या.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!