Join WhatsApp group

Ads

मुर्तिजापूर : भरधाव ट्रक थेट घरात घुसला; सुदैवाने जीवितहानी टळली

By Sarkarmzanews

May 31, 2025 11:44 am

Ads

दिनाक ३१ :मुर्तिजापूर – भीम नगर बायपासजवळील टर्निंग पॉईंटवर मध्यरात्री दोनच्या सुमारास एक भरधाव ट्रक थेट रेल्वे लाईनलगत असलेल्या घरात घुसला.

या भीषण अपघातात घराचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.ट्रक (क्रमांक MH 14 9598) हा दर्यापूर च्या दिशेने जात असताना वळणावर अनियंत्रित होऊन घरात घुसला.

ट्रक घरावर आदळताच पलटी झाला असून त्यामधील टायर, बॉक्सेस आणि इतर सामान अस्ताव्यस्त पडले.घटनेनंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला.

मात्र, ट्रकमध्ये आढळलेल्या पाकीट आणि मोबाईलच्या आधारे चालक हा बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे दिसत आहे.घटनेची माहिती मिळताच मुर्तिजापूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांकडून संबंधित चालकावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे समजते.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!