Join WhatsApp group

Ads

-

शहरातले मटन चिकन दुकाने इतर ठिकाणी स्थलांतरित करा अन्यथा आंदोलन – भाजप शहर उपाध्यक्ष

By Sarkarmzanews

December 31, 2024 8:46 pm

Ads

मुर्तीजापुर : दि. ३१: मुर्तीजापुर शहरात बस स्थानक, अकोला नाका परिसर, बायपास येथे अनेक चिकन मटन दुकाने खुल्या जागेवर अतिक्रमण करून राजरोस पणे सुरु आहेत. त्यामुळे शहरात घाणीचे साम्राज्य पसरून लोकांचा आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मेन रोड चा लगत या दुकाना असल्यामुळे दुर्गंध सगळी कडे पसरतो त्या मुळे जनतेला नाहक त्रास होत आहे. दबक्या आवाजात याची चर्चा शहरात नेहमी सुरु असते.

खुल्या जागेवर जे दुकाने सुरु आहे यांना नियमा प्रमाणे नगरपरिषदचा परवाना अनिवार्य आहे, तसेच यांना मटन मार्केट मध्ये आपले दुकान लावण्याचे नियम आहे, ज्या जनावरांची कत्तल होते त्यासाठी त्या जनावराची आरोग्य चाचणी चे पण नियम व कायदे असतात पण सगळे नियम व कायदे धाब्यावर ठेवून मटन चिकन वाले मुर्तीजापुर शहराचा आरोग्याशी खेळ करताना सध्या दिसत आहे.

तसेच नगरपरिषद या विषयावर डोळे झाक करत आहे, या मध्ये काही राजकीय नेते या दुकानदारांची पाठराखण सुद्धा करीत आहे. असे आरोप करत भाजप शहर उपाध्यक्ष सचिन खरतडकर यांनी ३१ डिसेंबर रोजी नगर परिषद मुर्तीजापुर यांना निवेदन देत या दुकानांना लवकरात लवकर स्थलांतरित करण्याची मागणी केली आहे, मागणी न पूर्ण झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा भाजप कडून दिला आहे.

मागे काही महिन्यान पूर्वी पण सुद्धा सचिन खरतडकर हे उपोषणाला बसले असून यांना आश्वासन देत नगर परिषदेने कोणती कारवाई न करता केराची टोपली दिली होती, या वेळेस आता भाजप पक्षा कडून आंदोलन करून काय फरक पडतो हे पाहणे रोचक ठरेल.

No comments to show.

Leave a Comment

error: Content is protected !!